बीआर फिल्म्सच्या नावाखाली बनलेल्या व रवी चोप्रा निर्देशित केल्या द बर्निंग ट्रेन चित्रपट बनवायला ५ वर्षे लागली होती. हा चित्रपट बॉक्स वरील फ्लॉप ठरला होता.पण याची क्लासिक चित्रपटात गणना होते. द बर्निंग ट्रेनमध्ये विनोद खन्ना, धर्मेंद्र, विनोद मेहरा, डॅनी,जितेंद्र, नवीन निश्चल, हेमा मालिनी, परवीन बाबी, नितू सिंग अशी कलाकारांनी अभिनय केला होता.
द बर्निंग ट्रेन मध्ये डॅनीने ‘दिन रात’ एक करून बनवलेल्या ट्रेनच्या मॉडेलला संचालक इफ्तीकार असलेल्या रेल्वेचे परिक्षण मंडळ नकार देते आणि विनोद खन्नाने बनवलेल्या सुपर एक्सप्रेसच्या मॉडेलला मंजुरी देते. निराशा, असूया, इर्ष्या, राग, आणि बदला अशा सर्वच नकारात्मक भावनांचा खलनायक डॅनी सुपर एक्सप्रेसमध्ये बॉम्ब स्फोट घडवतो. त्यानंतर या गाडीत लागलेल्या आगीतून वाचण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आणि वाढणार्याय आगीसोबत मरणाशी केलेल्या चित्तथरारक सामन्याचे कथानक म्हणजे द बर्निंग ट्रेनची कथा…यात जितेंद्र-नितू आणि हेमा-धमेंद्रच्या प्रेमाचे उपकथानक जोडलेले आहे. ही सर्व कथानके जळणार्यार गाडीच्या वेगासह पुढे उलगडत जातात.
चाळीस वर्षांपूर्वी व्ह्युजअल आणि साऊंड इफेक्ट्सना मर्यादा होती. चित्रपटातील अखेरचा मुंबई सेंट्रलचा खेळण्यातल्या ट्रेनचा प्रसंग वगळता संपूर्ण सिनेमाची हाताळणी दिग्दर्शक रवी चोप्रांनी चित्तथरारक अशीच केली होती. बर्निंसग ट्रेनची कथा व पटकथा कमलेश्वर यांची होती,यातील गाणी साहीर यांनी लिहिली होती व संगीत होते आर.डी.बर्मन यांचे. ‘द बर्निंग ट्रेन’या चित्रपटातील ‘पल दो पल का साथ हमारा’हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे.असे बोलले जाते की या चित्रपटाचा रिमेकही लवकरच येणार आहे.
‘द बर्निंग ट्रेन’ चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=b8MRyCQx5Z0
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
७० चं दशक संपता-संपता ह्या चित्रपटाचे चित्रीकरण, पनवेल रेल्वेस्टेशन येथे झालं होतं. आम्ही त्यावेळेस काही-तरी नववी-दहावीला होतो व रात्री प्रत्यक्ष चित्रीकरण पहाण्याची संधी आम्हास लाभली होती.
तो काळ अमिताभ-विनोद खन्ना या जोडीचा होता. त्यामुळे या चित्रपटात विनोद खन्नाचा मेन रोल असलेला दिसतो. त्याआधीच्या काळात धर्मेंद्र, जितेंद्र हे नायक असायचे आणि विनोद खन्ना हा खलनायक म्हणून किंवा इतर दुय्यम भूमिकेत त्यांच्या समोर दिसायचा, पण या चित्रपटात तो मेन हिरो म्हणून दिसतो आणि धर्मेंद्र, जितेंद्र हे साहाय्यक भूमिकेत आहेत. यावरुन विनोद खन्ना त्या काळात सुपरस्टार झाला होता, हे दिसून येतं!
या छान लेखामुळे जुन्या आठवणी जागृत झाल्या! त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..!! ?