पूना वुमेन्स कौन्सिल आयोजित रौप्य महोत्सवी पुष्प प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी जेट युगातील प्रतिथयश पुष्पप्रेमी मराठी उद्योजक कै.शंतनुराव किर्लोस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “पुणे हे फुलांचे शहर व्हावे” असा दुर्दम्य आशावाद व्यक्त केला होता.
आज आपण पुणे शहर नव्हे तर अपूर्ण पुणे जिल्हा पुष्पमय झालेला अनुभवत आहोत.यासाठी असंख्य पुष्प उत्पादक शेतकरी,बागकाम प्रेमी,पुष्प विक्रेते,हौशी व तज्ज्ञ पुष्प रचना कार,पुष्पशेती संबंधित संस्था व विविध प्रसंगी हौशीने खर्च करून फुले विकत घेणारे आणि सजावट करून घेणाऱ्या पुष्प प्रेमिंचे मोठे योगदान आहे.
आज पुणे शहरात विविध संस्था तर्फे सातत्त्याने पुष्पप्रदर्शने आयोजित केली जातात यात प्रामुख्याने एम्प्रेस गार्डन येथील वेस्टर्न हॉर्तिकल्चर सोसायटी,पुणे रोज सोसायटी,पुणे व पिंपरी चिंचवड मनपा यांचा समावेश आहे. नव्याने पुष्परचना,सजावट शिकणाऱ्यांसाठी नियमितपणे व अत्यल्प दरात पुष्प सजावटीचे प्रशिक्षण कार्य क्रम यायोजित करणारे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,पुणे आणि मिटकॉन या संस्था मुळे पुष्प रचना या व्यवसायाला चांगले दिवस पाहायला मिळतील यात शंका नाही.
पुण्यातील हवामान पुष उत्पादनासाठी सोयीचे असल्याने महाराष्ट्र शासनाने तळेगाव जवळ floriculture पार्क ची निर्मिती करून आज जागतिक नकाशावर पुणे हे फुलांचे माहेर घर असा नवलावकिक मिळविण्यासाठी पात्र ठरले आहे.जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सेंट व्हॅलेंटाईन डे साठी विदेशात ५० ते६० लाख गुलाबाची निर्यातक्षम फुले पाठवली जात आहेत.तर ८० ते ९० लाख गुलाबाची विक्री पुण्यात होण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुण्यातील आघाडीचे पुष्परचना कार स्नेह फ्लोरिस्ट चे संचालक व्यक्त करत आहेत.पुणे तिथे काय उणे हे अगदी खरे आहे.
शंतनुराव किर्लोस्कर यांच्या दुर्दम्य आशा वादा ला पंढरीनाथ म्हस्के या किरकोळ फुलं विक्रेत्यांचा मानाचा मुजरा. सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन डे.
Thanks for the nice information. I will be part of the *FLORIST*very soon under your BEAUTIFUL and HELPFUL guidance.