देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेली ही पहिली लोकसभा निवडणूक होय. देशातील २५ राज्यांतील ४८९ जागांवर २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ या काळात मतदानाची प्रक्रिया पार पडली. जवळजवळ चार महिने पार पडलेल्या या निवडणुकीत ४५.७ टक्के मतदान झाले. २५ ऑक्टोबर १९२५ रोजी हिमाचल प्रदेशमधील चिनी या तालुक्यात पहिल्या मताची नोंद झाली.
त्या वेळी लोकसभेच्या एकूण ४८९जागा होत्या व बहुमतासाठीचे आवश्यक संख्याबळ होते २४५. पहिल्या लोकसभेसाठी मतदानाची टक्केवारी- ४५.७ टक्के राहिली तर ग. वा. मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते व पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते व श्रीपाद अमृत डांगे हे विरोधी पक्षनेते होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या हंगामी सरकारमधील त्यांच्या दोन सहका-यांनी काँग्रेसपासून वेगळे होऊन वेगळ्या पक्षाची स्थापना केली. यात श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ऑक्टोबर १९५१मध्ये ‘जनसंघ’ पक्षाची स्थापना केली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ पक्षाची स्थापना केली.
नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने बहुतेक राज्यांमध्ये सत्ता मिळवली. लोकसभेच्या ४८९पैकी ३६४ जागा जिंकत पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट विजय मिळवला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दुस-या क्रमांकाच्या म्हणजे १६ जागा जिंकल्या. आज जगातील सर्वांत मोठी लोकशाही ठरलेल्या भारतातील या पहिल्या लोकसभा निवडणुकीत ४०१ मतदारसंघातून ४८९ खासदारांची निवड करण्यात आली होती. यापैकी ३१४ मतदारसंघांतून एक खासदार, ८६ मतदारसंघांतून दोन खासदार, तर एका मतदारसंघातून तीन खासदार लोकसभेवर गेले होते.
४८९ जागा असलेल्या पहिल्या लोकसभेत काँग्रेसला ३६४, भारतीय कम्युनिस्ट पक्ष १६, सोशालिस्ट पक्ष १२, किसान मजदूर प्रजा पक्ष ०९, पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट ०७, गणतंत्र परिषद ०६, शिरोमणी अकाली दल ०४, अखिल भारती हिंदू महासभा ०४, भारतीय जनसंघ ०३, अपक्ष ३७, ॲग्लो इंडियन सदस्य २ अशा जागा मिळाल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या हंगामी सरकारमधील त्यांच्या दोन सहका-यांनी काँग्रेसपासून वेगळे होऊन वेगळ्या पक्षाची स्थापना केली. यात श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ऑक्टोबर १९५१मध्ये ‘जनसंघ’ पक्षाची स्थापना केली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ पक्षाची स्थापना केली.
पहिल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सोशालिस्ट पक्ष, किसान मजदूर प्रजा पक्ष आदी पक्ष निवडणुकीत होते. मात्र काँग्रेसच्या पुढे कोणत्याही पक्षाला मोठे यश मिळू शकले नाही.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान देणा-या काँग्रेस पक्षाला पहिल्या निवडणुकीत मोठे यश मिळणे साहजिकच होते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दुस-या क्रमांकावर असलेल्या पक्षापेक्षा चौपट अधिक जागा मिळाल्या होत्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला १६ जागा मिळाल्या. तर ३७ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. सोशालिस्ट पक्षाने १२ जागांवर विजय मिळवला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन (भविष्यात या पक्षाचे नाव रिपब्लिकन पक्ष असे झाले) या पक्षाला दोन जागांवर विजय मिळवता आला. पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (सात जागा), शिरोमणी अकाली दल (चार जागा) यासह अनेक छोट्या राजकीय पक्षांना या निवडणुकीत काही प्रमाणात यश मिळाले होते.
निवडणुकीनंतर जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान बनले. या पहिल्या लोकसभेने १७ एप्रिल १९५२ ते ४ एप्रिल १९५७ असा पहिला पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन बॉम्बे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ द्विसदस्यीय होता. एक जागा सर्वसाधारण तर एक जागा रखीव, अशी त्याची विभागणी केली होती. आठ उमेदवारांमध्ये वि. ना. गांधी आणि नारायणराव काजरोळकर विजयी झाले. या पराभवानंतर मार्च १९५२ मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत ते मुंबई विधानसभेतून संसदेत गेले.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply