नवीन लेखन...

मराठी भाषेतील पहिलाच व एकमेव “ग्राहक तक्रार मंच”

The First Online Consumer Forum in Marathi

मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच  http://grahaktakrarmanch.forumotion.in/forum

कुठे तक्रार करायची सोयच नाही अशी सगळ्यांचीच तक्रार असते. पण आता मात्र असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. कारण केवळ तक्रारी करण्यासाठीच ग्राहक तक्रार मंच नावाने एक स्वतंत्र मंच (Forum) सुरु झाला आहे. पण येथे फक्त तक्रारीच आहेत अशी तक्रार मात्र तुम्ही करु नका बरं का!

उद्देश :

तक्रारीविषयी इंटरनेटवर सर्च करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, इंटरनेटवर आज जे काही तक्रार मंच (Complaint Forum) आहेत ते प्रामुख्याने इंग्रजी भाषेतूनच आहेत. नेमकी हीच गोष्ट मराठी मातृभाषा असलेल्या मराठी भाषिकांना अडचणीची ठरते. मराठी भाषेतून आपण आपली तक्रार जशी व्यवस्थितपणे मांडू शकतो, तशी इतर भाषेतून ती प्रभावीपणे मांडताना अडचणच येते. म्हणून मराठी भाषेतून तक्रारी मांडण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास, मराठी बांधवाना त्याचा निश्चितच फायदा होईल याच उद्देशाने “ग्राहक तक्रार मंच”ची निर्मिती करण्यात आली आहे.

१) या मंचावर सर्वांना आपल्या तक्रारी मराठी भाषेतून मांडता येतील.

२) ज्या उत्पादन/सेवेविषयी सार्वजनिकरित्या तक्रारी केल्या जात असतील, त्या उत्पादकावर/सेवा पुरवठादारावर दबाव निर्माण होऊ शकेल.

३) तक्रारीशी संबंधित उत्पादक/सेवा पुरवठादारांचे प्रतिनिधींनी या मंचावरील त्यांच्याशी संबंधित अशा तक्रारींचे निराकरण या मंचाद्वारे करावे अशी अपेक्षा आहे.

४) एखाद्या उत्पादनाचा किंवा सेवेचा काही ग्राहकांना जर वाईट अनुभव आला असेल व त्यांचे समाधान करण्यात संबधितांना अपयश आले असेल, तर त्यांचे अनुभव लक्षात घेऊन इतर ग्राहक ही सावध होऊ शकतील. अशी सेवा किंवा उत्पादन घेण्यापूर्वी त्याविषयी त्यांना आपले मत तयार करण्यास मदत होईल.

आवाहन :

आपल्या काही तक्रारी असतील तर या मंचावर अवश्य लिहा व इतरांनाही याविषयी सांगा.

आपल्या तक्रारीचे या मंचाद्वारे जर निराकरण, समाधान झाले तर त्याविषयी प्रतिक्रिया देण्यास विसरू नका.

अधिकाधिक सुधारणा होण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

— रमण कारंजकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..