२९ जानेवारी १९७५ रोजी इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ’ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.
भक्ती बर्वें मुंजुळेची भूमिकेत व सतीश दुभाषी प्रोफेसरच्या.
पुलंच्या ‘ती फुलराणी’तील ‘फुलराणी’ काळानुरूप बदलत गेली भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष, हेमांगी कवी अशानी ‘फुलराणी’ उभी केली. या सगळ्यांनी फुलराणी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली,
ती फुलराणी हे पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे.
पु.लंच्याच शब्दांत “ती फुलराणी” म्हणजे “स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रम्हघोटाळ्यात सापडलेल्या माणसांची कथा !” उच्चारशास्त्राचा प्रोफेसर अशोक फुलं विकणाऱ्या गावठी मंजुळेला “तीन महिने ही मुलगी माझ्या ताब्यात मिळू देत, राजघराण्यातील राजकन्या म्हणून एखाद्या समारंभात फिरवून आणेन हिला ” अशी पैज लावतो आणि मंजुळेच्या भाषाशुद्धीचा मजेदार प्रवास सुरु होतो !
या नाटकात हयात असेपर्यंत भक्ती बर्वे मुंजुळेची भूमिका करीत. भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष या मंजुळाची भूमिका करत. या चौघींनीही लेखक पु.ल.देशपांडे यांच्या मनातली मंजुळा रंगमंचावर साकारली.
सुनीताबाई देशपांडे यांनी पुलंच्या सर्व नाटकांच्या प्रयोगाचे हक्क कलाकारांसाठी खुले केले असल्यामुळे ‘ती फुलराणी’ला कॉपीराइट कायदा लागू होत नाही.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply