नवीन लेखन...

पहिला पाऊस आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक

 सन २०१८,  काल संध्याकाळी जोराच्या आंधी सोबत पाऊस हि आला. चक्क १० मिनिटे जोरदार पाऊस पडला.(दिल्लीत एवढा वेळ पाऊस क्वचितच पडतो). या वर्षीचा पहिला पाऊस, पण वातावरणात मातीचा सुगंध दरवळला नाही. दूध आणण्यासाठी घरा बाहेर पडलो. उन्हाळ्यात तापलेल्या सिमेंट कांक्रीटच्या रस्त्यावर पहिला पाऊस पडताच गरमागरम वाफा निघत होत्या व त्यासोबत घरा-घरात लागलेल्या AC तून बाहेर पडणारे उष्ण वारे हि. शरीर चांगलेच भाजून निघाले. सूर्यास्त होताच रस्त्यावरचे वीजेचे दिवे हि लागले. रात्रीचे जेवण झाल्यावर गच्चीवर शतपावली करता-करता मनात विचार आला. कित्येक वर्षांपासून रातकिड्यांची किरकिर ऐकू येत नाही. आज पहिला पाऊस पडला, पण  दिव्या भोवती फेर धरून नाचणारे पावसाळी किडे दिसत नाही. बेडूक अदृश्य होऊन कैक वर्षे झाली.  जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

१९८९ मध्यें बिंदापूर इथे स्थायी झालो. त्यावेळी गल्लीत फक्त तीन चार घरे होती.  गल्लीही विटांची होती. पाणी रोजच तीन ते चार तास मिळायचे. त्यावेळी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो.  तिथल्या स्टोर मध्ये  बियाणे खत सर्वच मिळायचे. माझ्या एका मित्राने आंगणातील २०x१० जी जागा शेती/ बागवानी साठी तैयार करून दिली. पुढे पाच ते सहा वर्ष पालक, सरसो, ग्वार, फूलगोबी, तोरी, भेंडी एवढेच काय शेंगदाणे आणि बटाटे हि घेऊन बघितले. या शिवाय गच्ची वर ठेवलेल्या गमल्यांत वांगे व टमाटर सात आठ महिने तरी राहायचेच.

त्या काळी रात्र झाली कि रात किड्यांचे आवाज ऐकू यायचे. आपण झारी ने किती हि पाणी पौध्यांना देत असलो तरी पहिल्या पाऊसाचे काही थेंब पडताच मातीचा जो सुगंध दरवळतो त्याचे वर्णन करणे अशक्यच. पहिला पाऊस पडताच, न जाने कुठून बेडूक हि मातीतून बाहेर येऊन डरांऊ-डरांऊ बेडूक गान सुरु करायचे. दरवर्षी दोन तीन बेडूक कुणालाही न जुमानता बैठकीच्या खोलीत तळ ठोकून बसायचे. रात्री पळविले तरी सकाळी उठल्यावर महाराज खोलीतच विराजमान दिसायचे. माझ्या दोन्ही पोरांसाठी पुढील तीन महिने ह्या बेडकांचे मागे पळणे हाच मुख्य खेळ होता. सेप्टेंबर महिना संपण्याच्या पूर्वी जसे आलें होते तसे बेडूक गायब व्हायचे.

पहिला पाऊस पडताच संध्याकाळी दिवे लागल्यावर शेकडोंच्या संख्येने पावसाळी किड्यांचे आंगणातल्या दिव्या भोवती फेर धरून मृत्यूनृत्य सुरु व्हायचे. त्यांची शिकार करायला जाड-जूड पाली हि टपलेल्या. मला नेहमीच स्त्री वर्गाची भीती वाटते पालींचीही वाटते.  कधी-कधी या पाली घरात यायच्या. मग आमची सौ. झाशीच्याराणी सारखी त्वेषाने त्या पालींना घरा बाहेर हाकलायची आणि मी एका कोपर्यात पालीन्पासून दूर लपून बसायचो.

काळ बदलला. विकासाचें वारे वाहू लागलें. गल्लीतील घरे ३ माल्याचें झाली. गल्ली हि सिमेंट कांक्रीटची झाली. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टेंकर सुरु झाले तिथे बागवानी साठी पाणी कुठून येणार. घरा समोरचे वरांडे अदृश्य झाले. प्रत्येक प्लॉट वर १०० टक्के निर्माण. लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. कार आणि AC घरात आले. अदृश्य झाले ते रात किडे, पावसाळी किडे आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक.

कधी-कधी मनात विचार येतो, बिंदापूर येथून फुल पाखरू, चिमण्या, मोर, रात किडे, बेडूक सर्वच अदृश्य झाले. असेच चालत राहिले तर एक दिवस मनुष्य हि ……

— विवेक पटाईत 

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..