ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेलेचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ट्रेस कोराकोसा, ब्राझिल येथे झाला.
फुटबॉल खेळाच्या अभ्यासकांच्या मते एड्सन अरांतेस दो नासिमेंतो उर्फ पेले हा आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू आहे.
‘पेले’ जागतिक क्रीडाक्षेत्रातील फुटबॉल खेळाचा बादशहा मानला जातो. क्रीडाक्षेत्रातील त्याच्या नैपुण्याविषयी जगातील सर्वच क्रीडारसिकांचे एकमत आहे की, कोणीही असा फुटबॉलचा खेळ खेळूच शकत नाही. पेले यांचा जन्म एका गरीब कृष्णवर्णीय घराण्यात झाला. त्याचे वडील दाँनडि न्हो हे एका स्थानिक क्लबच्या वतीने फुटबॉल खेळत, त्यांना जे पैसे मिळत त्यावर या कुटुंबाची उपजीविका चालत असे. एकदा अशाच एका फुटबॉलच्या चुरशीच्या सामन्यात त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली होती. त्या वेळी पायावर वैद्यकीय उपचार करण्यासाठीदेखील त्याच्याजवळ पैसे नव्हते. पेले त्या वेळी फक्त सहा वर्षांचा होता. वयाच्या १६व्या वर्षीच पेले सेंटोसा क्लबतर्फे खेळू लागले. फॉर्वर्डला खेळणाऱ्या पेलेंच्या पायांचे व गोलचे जणु नातेच जुळले होते. त्यांच्या पायाशी फुटबॉल आला की त्याला दोन्ही पायांनी खेळवत ते हरिणाच्या चपळाईने प्रतिपक्षाचा बचाव भेदत त्याला गोलच्या चौकटीत पाठवून देत. ते ब्राझिलच्या राष्ट्रीय संघाकडून खेळू लागले व ब्राझिल फुटबॉल मधील अभेद्य शक्ती बनले. तीन विश्वचषक (१९५८, १९६२ व १८७०) जिंकण्याचा विक्रम ब्राझिलच्या नावावर लागला तो पेलेमुळेच. विश्वचषकात पेलेंनी ९१ सामन्यांत ७७ गोल केले. हाही अबाधित विक्रम आहे. १९७७मध्ये पेलेंनी स्पर्धात्मक फुटबॉलमधून मोठ्या सन्मानाने निवृत्ती घेतली. तब्बल पाव शतक जागतिक फुटबॉललचा अनभिषिक्त सम्राट राहीलेले पेले २० व्या शतकातील सर्वोत्तम खेळाडू तर ठरेलच शिवाय या शतकावर प्रभाव टाकणाऱ्या ५० व्यक्तींच्या पंक्तीत जाऊन बसला. त्यांच्या कारकीर्दीतील १३६३ सामन्यांत त्यांच्या नावावर १२८१ गोलांची नोंद झाली. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉड मध्ये झाली. या कृषिणवर्णिय खेळाडूचे वर्णन ‘काळा मोती’ असे केले जाते व फुटबॉलप्रेमी प्रेमाने त्यांना ‘द किंग’ असेच संबोधतात.
पेलें यांना ब्रिटनच्या राणीने ‘सर’ हा किताब दिला. रोनाल्ड रेगन अमेरिकेचे अध्यक्ष असताना अमेरिकन कॉग्रेसने त्यांचा सत्कार केला. युनेस्कोने त्यांची ‘शांततेचा दूत’ म्हणून नेमणूक केली, ब्राझिलच्या अध्यक्षांनी त्यांचे वर्णन ‘ब्राझीलचा खजिना’ असे केले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply