२४ एप्रिल २००२ हा सचिन तेंडुलकरचा २९ वा वाढदिवस. सर्वात प्रथम सचिनला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुक्षेच्छा! आणि योगायोगही असा की, सचिनने स्वतःच्याच २९ व्या वाढदिवसानिमित्त साऱ्या क्रिकेट शौकीनांना २९ व्या कसोठी शतकाची क्षेट दिली. त्यासाठी सचिनचे मनःपूर्वक अभिनंदन!
क्रिकेट कसोटीत आपणे वैयक्तिक शतक पूर्ण करून क्रिकेटचे भिष्माचार्य सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ शतकाची बरोबरी गाठली आणि आपल्या शिरपेचात आणखी एक पिस रोवले. खरोखर सचिन यू आर ग्रेट!
वास्तविक साऱ्या क्रिकेट शौकीनांना तसे फारसे विशेष वाटत नसेल. कारण सुनिल गावसकर याने यापूर्वीच सर डॉन ब्रॅडमन यांचा शतकाचा विक्रम मोडून स्वतःच्या नावावर ३४ शतके नोंदवुन ठेवली आहेत. तरी सुद्धा सचिन बॅट घेऊन मैदानात फलंदाजी करण्यासाठी उतरतो तेव्हा साऱ्या क्रिकेट शौकीनांच्या विशेषतः भारतीय शौकीनांच्या नजरा सचिनच्या शतकाकडे चातकाप्रमाणे वाट पहात असतात. जर कधी सचिन बाद झाला तर मात्र सारे शौकीन आपापले टी.व्ही. संच बंद करून आपआपल्या कामाधंद्याला लागतात.
मुळात सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तो स्वतः विरुद्ध दुसरा संघ असा सरळ सरळ सामना असतो. कारण क्रिकेटमध्ये अकरा जणांचा संघ असला तरी क्रमांक एकपासून अकरापर्यंत फलंदाजी करायला तो समर्थ असतो. तो फक्त फलंदाजी करूनच सामना जिंकून दिल्याची उदाहरणे आहेत. एकदा तर त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना ३२ धावांत पाच बळी घेऊन जिंकून दिला होता.
कदाचित अनेक चाहत्यांना ठाऊक नसेल, ज्या सचिनने सामना गोलांदाजी करून जिंकून दिला त्याच सचिनला ऑक्टोबर १९७८ साली मद्रास येथे एम.आर.एफ. पेस फाउंडेशनच्या चाचणी शिबिरात वेगवान गोलंदाज बनण्यासाठी गेला असता त्याला गोलंदाज म्हणून नाकारले गेले होते. त्याला नाकरण्यामध्ये त्या शिबिरात भारताचा माजी – कर्णधार वेंकट राघवन व डेनिस लिली हे होते.
आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या मद्रासच्या चेपॉक स्टेडीयमवर सचिन तेंडुलकरला गोलंदाज म्हणून नाकरले शिवाय त्यांच शिबिरात फलंदाजीसुद्धा न करायला मिळालेल्या सचिनने त्याच चेपॉक स्टेडियमवर काही दिवसात खुद्द डेनिस लिली आणि वेंकट राघवन यांच्या समोर इंग्लड विरुद्ध शतक फटकावले. मात्र वयाच्या आठ नऊ वर्षापासून उराशी बाळगलेले वेगवान गोलंदाजाचे स्वप्न पूर्ण करु शकला नाही.
सचिन एकदा खेळायला मैदानात उतरला की, तो त्या खेळाशी १०० ठक्के निष्ठावान असतो. फलंदाजी असो, गोलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण असो सचिन त्यामध्ये समरस झालेला असतो. मैदानात तो एखाद्या लढवय्या प्रमाणे शीर तळहातावर घेऊन कधी-कधी एकटाच लढत असतो. अशा वेळी समोर कितीही महान गोलंदाज असो, जसा अक्रम, मॅकग्रा, डोनाल्ड किंवा ओडुंबे त्याच्या समोर सारे सारखेच असतात.
सचिनचा जन्म मुंबईतच झाला. त्याचे सारे बालपण मुंबईतील वांद्रयाच्या साहित्य सहवासात गेले. सचिन लहानपणापासूजनच इतर मुलांप्रमाणे भोवरा, गोट्या, पतंग खेळण्यात दंग असायचा. एका जागेवर स्वस्थ बसणे त्याला पसंत नव्हते. सतत मैदानात मैदानी खेळ खेळणे हा त्याचा आवडता छंद होता. साहित्य सहवासातल्या मैदानात मोठ्या मुलांमध्ये बरोबरीने खेळून आपला वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून स्वतःची अशी खास शैली निर्माण केली. तेव्हा मोठ्या मुलांना आश्तवर्य वाटल्यावाचून राहिले नाही. कारण ती जेव्हा फलंदाजी करायचा तेव्हा त्याचे हात ज्या पद्धतीने हालचाल करीत. असे वाटे की क्रिकेठ हे त्याच्या नसा-नसात भरलेले आहे. एखाद्या परीपूर्ण क्रिकेटपटूसारखा त्याचा खेळ असायचा.सचिनचे शालेय शिक्षण दादरच्या शारदाश्रम विद्यालयात झाले. त्यामुळे त्याला मुलांसाठी मुंबईत होणाऱ्या दोन क्रिकेट टूर्नामेंट “गाईल्स शिल्ड’ आणि “हॅरीस शिल्ड? मध्ये खेळण्याच्या योग आला. त्यानेही मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन त्यात चांगले यश मिळवले. यश मिळविता मिळविता त्यात त्याला स्वतःचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत झाली. मुळात क्रिकेटचा हिरा असलेल्या सचिनला पैलू पाडण्याचे काम क्रिकेट प्रशिक्षक श्री. रमाकांत आचरेकर यांनी केले. त्यामुळे सचिन त्यांच्या तालमीत तयार झाल्यानंतर खरोखर एका हिऱ्यासारखा चमकू लागला. तो आजतागायत साऱ्या जगात आपले तेज चमकवत आहे.
सचिनच्या जड बॅटचे गुपित असे सांगितले जाते की, सचिन आणि त्याचा मोठा भाऊ यांच्यात अकरा वर्षांचे अंतर आहे. त्याचा भाऊसुद्धा चांगला क्रिकेटीअर होता. भाऊ घरात नसला की सचिन गुपचूप त्याची बॅट घेऊन खेळत असे. त्यामुळे भावाची मोठी बॅट छोट्या सचिनला जड वाटली तरी तो त्या बॅटने खेळत असे. कदाचित ती सवय सचिनला लागल्यामुळे सचिनची बॅट इतर खेळाडूंच्या बॅठच्या मानाने जड असावी.
शालेय जीवनात असतानाच डॉन बॉस्को विरुद्ध शारदाश्रम असा सामना क्रॉस मैदानात खेळला गेला. तेव्हा सचिनने दहा चौकार ठोकून अर्धशतक झळकाविले. त्यावेळी सामन्याचे पंच असलेले श्री. गोंधळेकर सचिनच्या खेळावर खूष झाले आणि श्री. रमाकांत आचरेकरांना म्हणाले की, सचिन भावी काळात भारताच्या क्रिकेट संघातून खेळेल आणि खरोखरच केवळ पाच वर्षांच्या आत सचिन भारतीय संघातून खेळला, मात्र त्याच्या खेळ पाहण्यासाठी पंच गोंधळेकर या जगात नव्हते. सचिनच्या शालेय जीवनातील अविस्मरणीय सामना म्हणजे १९८७-८८ च्या मोसमात हॅरीस शिल्ड स्पर्धेतला अंतिम सामना त्यावर्षी तो सामना सी.सी.आयच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळला गेला होता. अंतिम सामना होता अंजुमन-ए-इस्लामचा संघ आणि शारदाश्रम विद्यालय संघ. या सामन्यात सचिनचा खास मित्र विनोद कांबळी सुद्धा खेळला होता. पण तो आपला विशेष प्रभाव पाडू शकला नाही. त्या सामन्यात सचिन दुसऱ्या दिवशी अखेर २८६ धावांवर नाबाद होता आणि शारदाश्रमची धावसंख्या होती ७ बाद ५००. दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांनी सचिनची तोंडभरुन स्तुती केली. काही इंग्रजी वर्तमानपत्रात तर तेंडुलकर अनस्टॅपिबल, तेंडुलकर स्टील्स शो अगेन अशा हेडलाईनने सचिनच्या फोठोसहीत झळकले.
त्याच दिवशी भारतीय निवड समितीचे अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर् यांनी सचिनची प्रत्यक्ष भेट घेतली आणि इंग्लंडमध्ये तुला क्लब सामने खेळायला आवडेल का? असे विचारले पुरस्कर्त्यांची व्यवस्था करण्याची तयारीही त्यांनी दाखविली.
सचिनला हे ऐकून फार आनंद झाला. याच खेळामुळे सचिनला सी.सी.आय. चा प्लेईंग मेंबर करुन घेण्यात आले. तात्काळ पुढल्या वर्षाच्या मोसमापासून सचिन सी.सी.आय साठी कांगा लीग आणि इतर क्लब स्पर्धा खेळायला लागला.
सचिन मुंबईतर्फे रणजी करंडक सामन्यात प्रथमच खेळण्यास उतरला तेव्हा त्याचा खेळ पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर लिटील मास्टर सुनिल गावस्कर, एकनाथ सोलकर, मिलींद रेगे आदी मान्यवर उपस्थित होते. सचिननेही त्यांना नाराज केले नाही. आपल्या या पदार्पणाच्या रणजी सामन्यात शानदार शतक झळकतवूत़ सर्वांची वाहवा मिळविली. शतक पूर्ण करतांना त्याने आपल्या ठेवणीतले कव्हर ड्राईव्ह, पुल, स्क्वेअर कॅट स्वीप असे फटके मारुन आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. आणि तो रणजी स्पर्धेत शतक झळकवणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
सचिनची क्रिकेट कारकीर्द घडत असताना सुनिल गावसकरने केवळ क्रिकेट संबंधीच नव्हे तर इतर बाबतीतही वेळच्या वेळी बहूमुल्य सल्ले दिल्याचे दाखले उपलब्ध आहेत. उदाहरण द्यायचेच झाले तंर सचिन शाळा कॉलेजात शिकत असताना सुनिल गावसकरने त्याला सांगितले होते की, “क्रिकेट खेळत असताना अभ्यासात मात्र दुर्लक्ष करु नकोस. कारण माणसाने कोणतेही क्षेत्र निवडले तरी पडत्या काळात त्याला त्याचे शिक्षणच कामी येते?” मला वाटते, सुनिल गावसकरचा हा सल्ला केवळ सचिनलाच लागू पडतो असा नव्हे, तर प्रत्येक तरुण विद्यार्थ्याला हा सल्ला महत्वाचा आहे.
– विद्याधर ठाणेकर
सन्मित्र २४ एप्रिल २००२
Leave a Reply