नवीन लेखन...

मुंबईच्या इतिहासाच्या पाऊलखूणा – ट्राम

The Historical Tram in Mumbai

p-23032-BEST-Tram-in-mumbai

ब्रिटिशकालीन मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे लोकप्रिय साधन म्हणून ट्राम ओळखली जायची. ससून डॉकपासून थेट किंग्ज सर्कलपर्यंत या ट्रामचे जाळे पसरले होते. ऑपेरा हाऊस, चर्नीरोड, गोल देऊळ, सीपी टँक, ताडदेव, बोरिबंदर (आत्ताचे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस), जे. जे. रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आदी अनेक भागांमध्ये या ट्रामने प्रवास करता येत असे. BEST कडून ही सेवा चालवली जात असे. जसजशी मुंबईतील वाहनांची गर्दी वाढत गेली तसतशी ही हळूहळू चालणारी ट्राम बहुतेक त्रासदायक व्हायला लागली आणि अखेर बंदच झाली.

काल फोर्टमधल्या हुतात्मा स्मारक परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याखाली गाडले गेलेले ट्रामचे रूळ पुन्हा दिसायला लागले आणि कधी काळी या ट्रामने प्रवास केल्याच्या मुंबईकरांच्या आठवणी जाग्या झाल्या. मला स्वत:ला माझ्या आजोबांबरोबर केलेला या या ट्रामचा प्रवास आठवतोय. बहुतेक दादर टीटी ते परळ असा हा प्रवास केला होता. दादर टीटी हा शब्द आपण नेहमी वापरतो. हा टीटी शब्द म्हणजे ट्राम टर्मिनस चा शॉर्टफॉर्म होता. परळलाही असेच ट्राम टर्मिनस होते आणि त्यालाही परळ टीटी म्हणत. या ट्रामचं तिकिटंही होतं काही पैसे किंवा काही आणे.

ब्रिटिशांनी जशी रेल्वे मुंबईत आणली तशीच ट्रामही त्यांचीच देणगी. १८९५ मध्ये तेव्हाचे मद्रास आणि आताचे चेन्नई येथे विजेवर चालणारी ट्राम पहिल्यांदा धावली. कोलकात्यात १९०० मध्ये, मुंबई व कानपूरला १९०७ मध्ये आणि दिल्लीत १९०८ मध्ये ट्राम सुरु झाली.

मुंबईतल्या ट्रामची योजना ब्रिटिशांनी १८६४ मध्ये आखली. ते कंत्राट त्यांनी स्टर्नस व किटरेज यांना दिले. आणि ९ मे १८७४ ला परळ ते कुलाबा अशी पहिली ट्राम ओढली गेली. होय… ओढली गेली कारण तीच्या इंजिनाच्या जागी होते सहा किंवा आठ घोडे. विजेवरची ट्राम यायला आणखी ३३ वर्षे गेली.

मुंबईतली ट्राम जेव्हा बंद झाली तेव्हा शेवटच्या ट्रामच्या शेवटच्या फेरीला लोकांनी केवळ निरोप द्यायला तुफान गर्दी केली आणि ते ट्राम बरोबर ट्राम डेपो पर्यंत गेले. वाहनावरचे एवढे प्रेम बघून त्या चालकाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले.

आता मजा बघा.. जोपर्यंत फोर्ट परिसरात सापडलेले ट्रामचे हे रुळ रस्त्याच्या खाली गाडले गेले होते तोपर्यंत कोणालाच त्यांची आठवण नव्हती. मात्र आता ते सापडल्यावर BEST ने ते आपल्या मालकीचे आहेत असे सांगत हे चारही रूळ व्यवस्थित उखडून ते आणिक आगार येथील बेस्टच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. खरेतर हे रुळ म्हणजे केवळ BEST च्या आठवणींचा ठेवा नसून मुंबईच्या इतिहासाच्या पाऊलखूणा आहेत.

आणि तसेही आपल्याकडे रस्त्यांची कामे करताना पूर्वीप्रमाणे रस्ता खणून नव्याने बांधला जात नाहीच. असलेल्या रस्त्यावरच दगड आणि डांबराचे नवे नवे थर दिले जातात. प्रशासनाने इतक्या वर्षात रस्ते शास्त्रशुद्धपणे बांधले असते तर हे रुळ तब्बल ५० वर्षे गाडून राहिलेच नसते.

मुंबईच्या अनेक रस्त्यांखाली ब्रिटिशकालीन मुंबईतील अशा अनेक ऐतिहासिक गोष्टी दडलेल्या आहेत. इतिहासाच्या या खुणा कोणाच्याही खिजगणतीत नसून नुसत्याच रस्त्याच्या अथवा रेल्वे स्थानकाच्या बाजूला पडून आहेत. या सर्वच गोष्टींच्या माध्यमातून मुंबईतील ऐतिहासिक ठेवा सांभाळून ठेवण्याची गरज मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करणारे इतिहासकार करत आहेत.

— निनाद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..