‘मातुरेव पिबेत्स्तन्यं तत्परं देहवृद्धये।’ – भाग १
आचार्य वाग्भट म्हणतात; ‘मातुरेव पिबेत्स्तन्यं तत्परं देहवृद्धये।’ म्हणजे बालकांना मातेचे दूधच द्यावे. कारण ते त्याच्या देहाचे संपूर्ण पोषण करणारे आहे. काश्यपसंहिता या ग्रंथातदेखील मातृस्तन्याचे महत्व विशद केलेले आहे. थोड्क्यात संपूर्ण जगाला स्तन्यपानाचे महत्व सर्वप्रथम सांगितले ते आयुर्वेदाने आणि पर्यायाने हिंदुस्थानाने.
आज त्याच देशात #BreastfeedIndia असा ट्रेंड ट्विटरवर सुरु आहे. आपल्या देशातल्या तरुण पिढीतील स्त्रियांना आज स्तन्यपानाचे महत्व मुद्दाम सांगावे लागणे हे दुर्दैवच नव्हे का? अगदी पाश्चात्य देशांसारखी परिस्थिती अजून आपल्याकडे ओढवली नसली तरी हे दृश्यदेखील स्पृहणीय नव्हे. मात्र ही नाण्याची केवळ एक बाजू झाली. दुसरी बाजू विस्तृतपणे उद्या!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Aug 2, 2016
Leave a Reply