अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरणारा आणि ‘ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ‘ , ‘ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ‘ व ‘ सर्वोत्कृष्ट बालकलाकार ‘ अश्या महत्त्वाच्या विभागांमध्ये राष्ट्रीय पुरस्कर मिळवणारा बहुचर्चित “धग” हा सिनेमा येत्या ७ मार्चला प्रदर्शित होत असल्याची घोषणा नुकतीच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकार, तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थतीत करण्यात आली.
परंपरागत सामाजिक व्यवसायाचं जोखाड दूर करण्याचा प्रयत्न करणा-या मुलाची ही कथा असून चित्रपटात उपेंद्र लिमये, उषा जाधव, नागेश भोसले, सुहासिनी देशपांडे, हसंराज जगताप, नेहा दाखिनकर या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत.
‘धग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केले असून , विशाल पंडीत गवारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (संकलन -सागर मालाडकर)
— सागर मालाडकर
Leave a Reply