नवीन लेखन...

तीस लाख ज्यूंचा बळी घेणारा कर्दनकाळ

ऑस्ट्रियाच्या लीन्झ शहरातील  शाळेत एक चुणचुणीत मुलगा होता.तो धर्माने प्रोटेस्टनट ख्रिश्चन होता पण वर्णाने कमी गोरा व काळे केस यामुळे सगळे त्याला “छोटा ज्यू” म्हणत असत.शाळेत त्याचे अनेक ज्यू मित्र होते.त्यांच्यात तो मिसळत होता.पण याच छोट्या ज्युने भविष्यात एक दोन नव्हे तर तीस लाखाहून जास्त ज्यूंची निर्दय हत्या केली होती.या छोट्या ज्युचे नाव होते,एडॉल्फ आइकमन.आणि योगायोग म्हणजे याच शाळेत सतरा वर्ष आधी हिटलर शिकत होता.

आइकमनचा जन्म १९ मार्च १९०६मध्ये सोलीन्गन यथे झाला.१९१३मध्ये त्याचे कुटुंब लीन्झ येथे स्थलांतरित झाले.आइकमन व्हायोलीन,खेळ, यात रस घेत असे.अभ्यासात मात्र तो साधारणच होता.१९२७ ते १९३३ त्याने रेडिओवर  काम केले. त्यानंतर त्याने एका ओईल कंपनीत काम केले.पुढे मित्रांच्या सांगण्यावरून त्याने ऑस्ट्रियाच्या नाझी शाखेत प्रवेश  घेतला.आणि हिटलरच्या शूट्स स्तफेल म्हणजे SS संघटनेचा सदस्य झाला.पुढे हिटलरने जर्मनीची सत्ता मिळवली.आणि आइकमनची SS संघटनेत बढती झाली.त्याला ज्यू संघटनेचा अभ्यास करून रिपोर्ट बनवण्याची जबाबदारी देण्यात आली. ज्युना ताबडतोब हद्दपार करून यातनातळावर पाठवण्याचे काम आइकमनला देण्यात आले. तो गाडी भरभरून ज्यू यातनातळावर पाठवू लागला.बरेचसे ज्यू  गाडीमध्ये श्वास कोंडून मारून जात. यातनातळावर त्यांची वर्गवारी केली जाई.अगदी म्हातारे आणि बालके, ज्यांचा कामासाठी काही उपयोग नाही त्यांना वेगळे काढून गोळी घालून ठार करण्यात येई.धडधाकट ज्युना खोलीत कोंबले जाई. त्यांच्या कडून गुरासारखे काम करून घेतले जाई.ते निरुपयोगी झाले कि त्यांना सुद्धा गोळी घालून ठार करण्यात येई . पुढे एका माणसासाठी एक गोळी हे सुद्धा खर्चिक व वेळखाऊ वाटू लागले म्हणून जे जे कामासाठी निरुपयोगी होत त्यांना चेंबरमध्ये कोंडून विषारी वायू सोडून सामुदाईक ठार केले जाई व खडडा खोदून त्यात गाडले जाई.हे आइकमनच्या देखरेखीखाली होत असे.

दुसरे  महायुद्ध संपले,तेव्हा आइकमन नातलगासोबत ऑस्ट्रियामध्ये रहात होता.जेव्हा त्याच्या लक्षात आले कि आपली ओळख पटली गेली आहे,तेव्हा त्याने आपली ओळख बदलून “ओटो हेनिंजर” या नावाने कागदपत्रे तयार केली.आणि अल्तोझाकोत या गावात १९५० पर्यंत राहिला.दरम्यान १९४८मध्ये त्याने आर्जेन्टीनामध्ये “रीकार्डो क्लेमेंट” या नावाने खोटे ओळखपत्र बनवून घेतले.ज्या मुळे त्याला आर्जेन्टिनाचा पासपोर्ट मिळाला. १९५०मध्ये तो आर्जेन्टिनाला सटकला.तो Ticuman परगण्यात राहू लागला.

१४ मे १९४८ मध्ये ज्यू लोकांसाठी इस्रायेल देश स्थापण्यात आला.आणि यातनातळावर वाचलेले  अनेक ज्युनी आइकमन व इतर नाझीना शोधण्यासाठी आपले आयुष्य वाहून घेतले. त्यापैकी विझेन्थल याला एका पत्रातून माहिती मिळाली कि आइकमन जिवंत आहे आणि तो आर्जेन्टिनामध्ये राहतो. त्याने हि माहिती व्हिएन्नाच्या इस्राईल कोन्सुलेटला कळवली.त्याने आइकमनचा फोटो मिळवला.पण तोच आइकमन याची खात्री नव्हती.एव्हडी माहिती मिळताच इस्राईलचे पंतप्रधान डेव्हिड  बेन गुरीअन यांनी निर्णय घेतला कि कोणत्याही परिस्थितीत आइकमनला इस्राईलमध्ये आणायचे.त्याने केलेले क्रूर कृत्य जगासमोर आले पाहिजे.

इथून थरार सुरु झाला.हि कामगिरी मोसाद( इसरेलची गुप्तहेर संघटना)कडे सोपवण्यात आली.आइकमन, क्लेमेंट नावाने san fernando येथे रहात होता.तो एका कारखान्यात काम करीत होता.मोसादने एक टीम बनवली त्यात  एक डॉक्टर होते.टीमचे  नेतृत्व अहारोनी करत होता. त्याच्याकडे पहिला क्लू  लोथर हर्मन नावाच्या माणसाकडून मिळाला .त्याने दावा केला कि तो रिकार्डो क्लेमेंटला म्हणजे आइकमनला ओळखतो. अहारोनी याने हरमनला  भेटल्यावर  एक आर्जेन्टिनाची नोट घेतली आणि त्याचे दोन तुकडे केले.त्याचा एक तुकडा हरमनला दिला.व सांगितले कि आपले जे बोलणे झाले आहे,ते दुसऱ्या कोणी सांगितले तर त्याला या नोटेचा अर्धा भाग माग.नाहीतर त्याच्यावर विश्वास ठेऊ नकोस. अहारोनी  san fernando येथे गेला.जिथे क्लेमेंट  म्हणजेच ( आइकमन) राहत होता.ते अतिशय घाणेरडे घर होते व तेथे आइकमन राहण्याची शक्यता नव्हती.त्यात वीज,पाणी नव्हते.पण आइकमन खरच तिथे राहत होता. अहारोनीने   त्याच्यावर पाळत ठेवली. तो कारखान्यातून रात्री ७.४० वाजता २०३ नंबरच्या बसने घरी परतत असे. अहारोनीने   २७ एप्रिलला आपली गाडी त्या घरापासून १ मैल दूर उभी केली.व घरापासून १०० यार्डावर थांबला. २०३ नंबरच्या बसमधून ७.४० ला एकजण उतरला तो आईक्मन होता. अहारोनीने   लगेच इस्राइलला तार पाठवली आईक्मन सापडला. ४ मे ला अहारोनी   २०३ नंबरच्या बस मध्ये चढला.त्यात आइकमन होता.त्यात एकच जागा रिकामी होती आणि ती नेमकी आइकमनच्या मागे होती. आर्जेन्टिना सरकारला नाझीबद्द्ल सिम्पथी होती.त्यांनी नाझीना संरक्षण दिले होते,त्यामुळे आर्जेन्टीनाने आइकमनला इस्राईलकडे सुपूर्द केले नसते.

त्याच सुमारास आर्जेन्टिनाला स्वातंत्र्य मिळून १५० वर्षे झाली म्हणून उत्सव होणार होता.इस्राईलने त्या उत्सवाला अभीष्टचिंतन देण्यासाठी विमानातून एक शिष्टमंडळ पाठवले. मोसादच्या गुप्तहेरानी खोटे पेपर बनवून आर्जेन्टिनात प्रवेश मिळवला. san fernando येथे प्रत्येकाने घर भाड्याने घेतले.११ मे रोजी अहारोनीने   गाडी घेऊन घर सोडले.त्यामागून गुप्तहेराची एक गाडी येत होती.जर कोणी पाठलाग केला तर वळणावर गाड्या वळवायच्या.व आइकमन नसलेली गाडी मागे घेऊन पाठलाग करणाऱ्यांना चकवायचे.आइकमनला  बेड्या घालायच्या आणि  सरळ पोलिसांकडे जायचे व सांगायचे कि आम्ही क्रिमिनल पकडला आहे व त्याला अधिकाऱ्याकडे घेऊन जातोय.म्हणजे पोलिसांना संशय येणार नाही.पण तशी वेळ आली नाही. अहारोनीने   रात्री ७.२५ ला गाडी आइकमनच्या घरापासून २५ मीटरवर थांबवली.पण आइकमन  ७.४०च्या बसने आलाच नाही.ते तिथून निघणार तेव्हड्यात मागील बसमधून  आइकमन उतरला .त्याला गुप्तहेरानी गाडीत कोंबला.त्याला चादरीखाली दाबले.त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली.त्याला जिवंत इस्रायेलला घेऊन जायचे होते.त्याला एका सुरक्षित घरात घेऊन गेले,तिथे त्याला ९ दिवस ठेवले.तो आइकमन आहे याची खात्री केली गेली. २०मेला त्याला गुंगीच औषध दिले व flight attendantचा ड्रेस चढवला.त्याचे डोळे बांधले व विमान इस्राईलकडे रवाना झाले. त्याच्यावर खटला चालवला.आणि १ जून १९६२ला फाशी देण्यात आले.

— रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..