नवीन लेखन...

सुक्या मेव्याचा राजा – बदाम

The King of Dry Fruits - Badam - Almond

सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात. त्यात असणाऱ्या अलौकिक गुणधर्मामुळे सौंदर्यप्रसाधन म्हणूनही त्याचा वापर केला जातो. तेल, साबण, क्रीम, मिठाई अशा विविध ठिकाणी बदामाचा वापर केला जातो.

औषधी गुणधर्म

शुष्क बदाम बी मधुर, कषाय, तीक्त गुणात्मक असून मधुर विपाकी व उष्ण वीर्यात्मक आहे. त्यामुळे बदाम बी स्निग्ध, बलकर, पौष्टिक, वातनाशक व कफकर आहे. या सर्व गुणधर्मामुळे आयुर्वेदात अनेक औषधांमध्ये बदामाचा वापर करतात. कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, ‘ब’ जीवनसत्त्व, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, खनिज, प्रथिने, स्निग्धता ही घटक द्रव्य बदामामध्ये असतात. या घटकांनी उत्साह वाढतो व शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राहून दीर्घायुष्य लाभतं. बदामाच्या देशी व जंगली अशा दोन जाती आहेत. जंगली बदाम हा चवीला कडू असतो. तर देशी बदाम हा गोड असतो.

उपयोग

० बदामाचं तेल केसांच्या मुळाशी लावलं असता केसांना पोषक घटक मिळाल्यानं केसांची वाढ चांगली होते व केस गळणं, कोंडा होणं, अकाली केस पिकणं या समस्या दूर होतात.

० डोळयांखाली काळी वर्तुळं तयार झाली असतील तर बदाम दुधामध्ये उगाळून त्यांचा लेप लावावा. लेप सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. नियमितपणे ही प्रक्रिया केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे निघून जातात.

० बदाम पेस्ट, दुधाची साय व गुलाब पाणी एकत्र वाटून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, मुरुमे जाऊन चेहरा टवटवीत व कांतीयुक्त होतो.

० बदाम रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी सोलून खावेत. याने स्मृतिभ्रंश, विस्मरण हे आजार कमी होतात.

० भिजलेल्या बदामाची पेस्ट दुधात कालवून दूध उकळावे व गाईचे तूप, वेलची, साखर घालून त्याची खीर बनवावी. ही खीर खाल्याने अशक्तपणा व थकवा दूर होतो. यासह वंध्यत्व
असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे या खिरीचं सेवन करावं.

० वारंवार डोकेदुखी होत असेल तर बदामाची खीर खावी. तीव्र डोकेदुखीमध्ये बदाम आणि कापूर दुधात उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा.

० शरीरामध्ये चांगल्या कोलेस्टेरॉलची निर्मिती होण्यासाठी नियमितपणे ४ बदाम रोज सकाळी उपाशीपोटी खावेत. यामुळे चांगल्या कोलेस्टेरॉलची (एच.डी.एल) निर्मिती होते व वाईट  कोलेस्टेरॉलला (एल.डी.एल.) प्रतिबंध केला जातो. तसंच हदयविकार, रक्तदाब हे विकार टाळले जातात.

० जुनाट मलावरोधाची तक्रार असेल तर नियमितपणे झोपताना ६-८ बदाम खाल्ल्यास सकाळी पोट साफ होतं.

० चेहऱ्यावर काळे वांग आले असतील किंवा ओठ काळे दिसत असतील तर दुधाच्या सायीमध्ये बदाम उगाळून हळुवार मालीश करावी. यामुळे काळसरपणा दूर होतो.

० त्वचा कांतीयुक्त होण्यासाठी बदामाचं तेल, चंदन तेल, लोणी व मध यांचं मिश्रण त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन रंग उजाळतो.

० मेंदू, हदय, डोळे यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी नियमितपणे बदामाचं सेवन करावं. ० शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी, बाळंतिणीचं दूध वाढविण्यासाठी, तिच्या शरीराची झीज भरून तसंच वातप्रकोप कमी करण्यासाठी बदाम,काजू, िडक, खोबरं, मनुका, चारोळी, पिस्ता, खारीक यांचे गूळ घालून लाडू बनवावेत. रोज नियमित एक लाडू खाल्ल्याने खूप फायदा
होतो.

सावधानता 

सहसा बदाम बी ही कवचाच्या आत असल्यामुळे सुरक्षित आहे. फक्त बदाम खाताना अति प्रमाणात खावू नये. ते सारक गुणधर्माचे असल्यामुळे अति खाल्ल्यास जुलाब होण्याची शक्यता असते.

— डॉ. शारदा महांडुळे, sharda.mahandule@gmail.com

आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन साभार 

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..