नवीन लेखन...

सॅक्सोफोनचे जादूगार मनोहारी सिंग

यांचा जन्म ८ मार्च १९३१ रोजी झाला.  मनोहारी सिंग यांचे घराणे वादकांचेच असल्यामुळे बालपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. त्यांची वाद्यवादनाची सुरुवात पाश्चात्त्य बासरी (क्लॅरोनेट) आणि मेंडोलीन या वाद्यांपासून झाली. अखेर सॅक्सोफोन या वाद्याला त्यांनी आपलेसे केले व त्यावर हुकूमत मिळविली.

१९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सितारों से आगे’ या चित्रपटातील गाण्यांसाठी संगीतकार एस. डी. बर्मन यांनी मनोहारी सिंग यांना संधी दिली. ‘सट्टा बाजार’ चित्रपटातील ‘तुम्हे याद होगा’ या गाण्यातील त्यांचे सॅक्सोफोनवादन लोकप्रिय झाले होते. ‘सबसे बडा रुपैया’ आणि ‘चटपटी’ या दोन चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले होते. संगीतकार आर. डी. बर्मन यांचे सहाय्यक म्हणूनही ते काम पाहत होते. ‘सॅक्स अपील’ नावाचा अल्बमही प्रकाशित झाला आहे. शालिमार चित्रपटातील ‘हम बेवफा हरगीज न थे’, दाग चित्रपटातील ‘मेरे दिल मे आज क्या है’, मेरा साया चित्रपटातील ‘तू जहॉं जहॉं चलेगा मेरा साया’, कटी पतंगमधील ‘ये शाम मस्तानी’, मेरे जीवन साथीमधील ‘ओ, मेरे दिल के चैन’, शोरमधील ‘एक प्यार का नगमा है’ तसेच ‘दर्या किनारे एक बंगला ग पोरी’ अशा शेकडो गाण्यांना त्यांनी सॅक्सोधफोनच्या सूरांचा साज चढविला. त्यामुळे त्या गाण्यांची लोकप्रियता वाढली.

शंकर-जयकिशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत-पॅरेलाल आदी नामवंत संगीतकारांसोबत त्यांनी काम केले होते. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा नेपाळ सरकारने गौरव केला होता. मनोहारी सिंग यांचे १३ जुलै २०१० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..