बेल्जियन संगीतज्ञ आणि संशोधक व सॅक्सोफोनचे निर्माते अँटोनिए जोसेफ उर्फ ॲडॉल्फ सॅक्स यांचा जन्म ६ नोव्हेंबर १८१४ रोजी झाला.
ॲडॉल्फ सॅक्स हे बेल्जियन संगीतज्ञ आणि संशोधक होते. एकाच व्यक्तीने शोध लावलेले आणि व्यापक वाजवले जाणारे सॅक्सोफोन हे एकमेव वाद्य असावे. ॲडॉल्फ सॅक्स यांनी १८४० च्या दशकात या वाद्याची निर्मिती केली.आपल्या घरच्या पारंपरिक वाद्यनिर्मिती व्यवसायात काम करता करता, वयाच्या चोविसाव्या वर्षी बेस क्लॅरिनेटची निर्मिती केली. पॅरिसमध्ये स्थलांतरीत झाल्यानंतर प्रयोग करता करता सॅक्सोफोन, सॅक्सट्रोम्बा, सॅक्सहॉर्न, सॅक्सट्यूबा अशा वाद्यांचा शोध लावला.
२८ जून १८४६ रोजी ॲडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोन या वाद्याचे पेटंट घेतले. अनेक वाद्यांमध्ये बदल केले; ज्यांचा आजही वापर केला जातो. सॅक्सोफोन हे वाद्य ब्रास सेक्शन आणि वूडविंड वाद्यांचा घडवलेला सुरेल संगम असल्यामुळे युरोप, अमेरिकेत या वाद्याचा जॅझमध्ये तत्परतेने वापर होण्यास सुरुवात झाली आणि ते लोकप्रिय झाले. विरोधाभास असा, की ॲडॉल्फ सॅक्स यांना आयुष्यभर झगडावे लागले. त्यांच्याबद्दल असूया असणारे लोक त्यांच्या वर्कशॉपमधून वेगवेगळी हत्यारे चोरायचे, त्यांच्यावर अनेक आरोप करायचे, पेटंट विषयी न्यायालयात अनेक दावे दाखल करून त्यांना त्रास दिला गेले, त्यांच्यावर जीवघेणे हल्लेही झाले.
वीस वर्षानंतर न्यायालयात दाखल केलेले पेटंटविषयी सर्व दावे सॅक्स यांनी जिंकले; परंतु या काळात त्यांना तीन वेळा दिवाळखोर घोषित केले गेले.
ॲडॉल्फ सॅक्स यांचे ७ फेब्रुवारी १९८४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply