कसोटीतील सर्वात अनुभवी पंच स्टीव्ह बकनर यांचा जन्म ३१ मे १९४६ रोजी जमेका येथे झाला.
स्टीव्ह बकनर हे वेस्ट इंडीज अनुभवी पंच. स्टीव्ह बकनर यांनी डिकी बर्ड यांचा विक्रम २००२ मध्ये मागे टाकून २००५ मध्ये कसोटीत १०० सामन्यात पंचगिरी करणारे ते पहिले पंच ठरले होते. बकनर यांनी १९९२, १९९६, १९९९, २००३ व २००७ च्या वर्ल्ड कप फाइनल मध्ये अम्पायरिंग केले होते. हे एक रेकॉर्ड आहे.
१२८ कसोटी आणि १८१ वन-डे मध्ये त्यांनी पंच म्हणून काम केले. काही महत्त्वाचे चुकीचे निर्णय देणाऱ्या बकनर यांना निवृत्तीच्या दोन वर्षे आधीच म्हणजे २०११ मध्ये निवृत्त व्हावे लागले. स्टीव बकनर यांनी फुटबॉल वर्ल्डकपच्या पात्रता फेरीच्या सामन्यातही रेफ्री म्हणून काम पाहिले आहे. स्टीव बकनर यांनी एल साल्वाडोर व नेदरलैंडस एंटाइल्सच्या दरम्यान वर्ल्ड कप क्वालीफायर सामन्यात फीफाकडून पंच म्हणून काम केले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply