भारताची महाराजा एक्सप्रेस ही ८४ प्रवाशांना घेऊन जाणारी आलिशान गाडी जशी जगप्रसिद्ध आहे, तशाच त-हेच्या जगातील काही गाड्यादेखील रेल्वेप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहेत. ह्या प्रसिद्ध गाड्या अशा आहेत:
१. रोव्हास रेल (दक्षिण आफ्रिका)
१९८९ साली सुरू झालेली ही अत्यंत आरामदायी व उत्तम अंतर्गत-सजावटीची जगातील क्रमांक एकची मानली गेलेली गाडी आहे. गाडी संपूर्ण सागवानी लाकडाची असून, तिचा जेवणाचा हॉल उत्तम अभिरुचीचे द्योतक आहे. या गाडीने २४ तासांपासून १५ दिवसांपर्यंतचा प्रवास करता येतो. घनदाट जंगलं, डोंगरदऱ्या, द्राक्षांचे मळे यांच्यामधून गाडीचा रस्ता जातो. ७२ प्रवासी नेण्याची क्षमता असलेल्या या गाडीत ३६ राजेशाही खोल्या आहेत.
२. व्हेनिस – सिम्पलीन ओरिएंट एक्सप्रेस: –
१९८९ सालापासून सुरू झालेली ही रेलगाडी सुप्रसिद्ध ब्रिटिश रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या कादंबरीमुळे (मर्डर ऑन दि ओरिएंट एक्सप्रेस) कायम प्रकाशझोतात राहिली. आजही पॅरिस, बुडापेस्ट, सिनाइआ, बुखारेस्ट, वरना, असा ६ रात्रींचा प्रवास या गाडीनं केला जातो. आलिशान डब्यातून शैंपेनचे घुटके घेत युरोपचं अविस्मरणीय दर्शन घडविणारी ही गाडी आहे.
३. ब्लू ट्रेन – दक्षिण आफ्रिका: –
महिन्यातून आठ वेळा ही गाडी प्रिटोरिया ते केपटाऊन या मार्गावर धावते. अनेक देशांच्या राजे व अध्यक्षांची ही आवडती गाडी आहे. २७ तासांच्या प्रवासात लॅम्ब, ऑयस्ट इम्पाला या सारख्या पदार्थांची लाजवाब मेजवानी जिभेचे सर्व प्रकारचे चोचले पुरविते.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply