शक्ति सामंत यांनी दिग्दर्शित केलेल्या कटी पतंगमध्ये राजेश खन्ना व आशा पारेख ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. प्रेम चोप्रा, बिंदू, नझीर हुसेन, सुलोचना, नाझ, सत्येन कप्पू, मदन पुरी, डेझी इराणी, ज्युनियर महमूद आणि हनी इराणी यांनी सुद्धा या चित्रपटात अभिनय केला आहे.
कटी पंतगमधल्या भूमिकेसाठी आशा पारेख यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
हा सिनेमा गुलशन नंदा ह्या प्रसिद्ध लेखकाच्या ‘कटी पतंग’ कादंबरीवर आधारित आहे. चित्रपट बनवतांना अगदी पुस्तकाप्रमाणेच केला आहे. गुलशन नंदा ह्यांच्या कादंबऱ्यांवरील आणखी सिनेमे म्हणजे दाग, खिलौना असे खूप आहेत.
या चित्रपटातली गाणी खूपच प्रसिद्ध झाली होती. ये श्याम मस्तानी, प्यार दिवाना होता है, ये जो मोहब्बत है, जिस गलीमें तेरा घर आणि टायटल सॉंग ना कोई उमंग है,आज ना छोडेगे, मेरा नाम शबनम ही सर्व गाणी असंख्य भारतीयांच्या ऑल-टाईम फेवरीट लिस्ट मध्ये असतील. अर्थात संगीत आर.डी बर्मन यांचे, किशोरकुमार, मुकेश, लता आणि आशा असे गायक गायिका असल्यावर दुसरं आणखी काय होणार म्हणा. उत्तम संगीत, अर्थपूर्ण संवाद व सुरेख चित्रीकरण या मुळे हा चित्रपट ४९ वर्षे झाली तरी अजून बघावासा वाटतो.
कटी पतंग चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=U44HKiKsB78
कटी पतंग चित्रपटातील गाणी
https://www.youtube.com/watch?v=7HTW1uUIIWQ
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply