नवीन लेखन...

नाटककार विल्यम शेक्सपिअर

नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म २३ एप्रिल १५६४ रोजी झाला.

एकूण ५२ वर्षांचे आयुष्य. त्यात ३४ नाटके. तीन दीर्घकाव्ये. १५४ सॉनेट्स.

जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपिअर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.

विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म इंग्लंड देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) ॲ‍शव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-ॲ‍रव्हन या गावात १५६४ साली झाला. त्यांचे वडील जॉन हे स्ट्रॅटफोर्ड गावातील एक व्यापारी होते तर रॉबर्ट आर्डेन नामक एका जमीनदाराची कन्या मेरी ही विल्यमची आई. वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात लॅटिन भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटिन, फ्रेंच आणि इटालियन भाषा शिक्षणासह चर्चमधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेई. मोठ्या कष्टाने विल्यमने देवाची भक्तिगीते आणि चर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले. १५८२ साली विल्यमने स्वतःपेक्षा वयाने ८ वर्षे मोठ्या असलेल्या ॲ‍डन हॅथवे नावाच्या मुलीशी लग्न केले. १५८५ साली त्याने आपले गाव सोडून लंडन गाठले. तेथे लॉर्ड चेंबरलेन यांच्या नाटक कंपनीत एका कलाकाराच्या जागेवर विल्यमला काम मिळाले. नाटकात काम करता करता विल्यमला व्यावहारिक ज्ञान मिळू लागले.

हुशार विल्यमने मग त्यावेळी रंगमंचावर सादर होणाऱ्या नाटकांत बदल करायला सुरुवात केली, आणि नाटकाच्या सर्वच विभागांविषयी माहिती करून घेतली. १५८५ पासून शेक्सपिअरची नाटय़कारकीर्द सुरू झाली असे म्हणता येते. त्याने पहिले नाटक केव्हा लिहिले याबद्दल अभ्यासकांत एकमत नाही. काही काळ नाटकात नट, लेखक अशी उमेदवारी केल्यावर १५९४ साली शेक्सपिअरने आपल्या काही मित्रांसमवेत Lord Chamberlain’s Men या नावाची एक नाटय़संस्था निर्माण केली. या संस्थोतर्फेच त्याची नाटके प्रथम रंगमंचावर आली. लवकरच तो अतिशय लोकप्रिय नाटककार म्हणून ओळखला जाऊ लागला. या काळात तो अधूनमधून नाटकात भूमिकाही करीत असे. नाटकाने त्याला केवळ कीर्ती व लोकप्रियताच मिळवून दिली असे नव्हे, तर भरपूर पैसाही मिळवून दिला. त्याने एकंदरीत अडतीस नाटके लिहिली. याशिवाय १५४ सुनीते, दोन दीर्घ कविता आणि काही स्फुट कविता अशी त्याची साहित्यसंपदा आहे. त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. मग अनेकांनी या नाटकांच्या प्रती तयार करण्याचा सपाटा लावला. पण नुसत्या स्मरणाच्या जोरावर तयार झालेल्या अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. मागणी असल्याचे लक्षात येताच स्वतः विल्यमनेच एक कंपनी स्थापून त्याच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरुवात केली. हळूहळू नाटकांची प्रसिद्धी वाढत गेली, विल्यम शेक्सपिअर यांचे उत्पन्न वाढत गेले. ग्लोब थिएटर नावाच्या नाट्यगृहाचे ते भागीदार झाले. नाटकांना व्यवसायाचे साधन मानणारे विल्यम शेक्सपिअर स्वतःची नाटके या नाट्यगृहात करू लागले. आता मिळणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढले. १६०५ पर्यंत तो स्टॅटफोर्डमधील अत्यंत श्रीमंत व्यक्तींपकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला होता. त्याच्या ३८ नाटकांपैकी १० ऐतिहासिक नाटके आहेत, १६ सुखात्मिका आहेत तर १२ शोकात्म नाटके आहेत. त्याची अगदी प्रारंभीची नाटके म्हणून ‘रिचर्ड तिसरा’ व ‘हेन्री सहावा’ ही ऐतिहासिक नाटके ओळखली जातात. त्याच्या अनेक नाटकांच्या नेमक्या लेखनवर्षांबद्दल मतभेद असले तरी सर्वसाधारणपणे ‘टायटस ॲ‍टड्रोनिकस’, ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ व ‘टेमिंग ऑफ द श्र्यूय’ ही नाटके त्याच्या उमेदवारीच्या काळातील मानली जातात. या सुरुवातीच्या नाटकावर थॉमस किड आणि ख्रिस्तोफर मार्लो या त्या काळी अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या नाटककारांचा प्रभाव दिसून येतो. मात्र लवकरच शेक्सपिअर या प्रभावातून मुक्त झाला.

विल्यम शेक्सपिअर यांचे निधन २३ एप्रिल १६१६ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..