देविकाराणी बॉम्बे टोकीजची नायिका, जन्म Waltair येथे ३० मार्च १९०८मध्ये बंगाली कुटुंबात झाला.वडील मन्मथा नाथ चौधरी मद्रास प्रेसिडन्सी मध्ये सर्जन होते.आजी रवींद्रनाथ टागोर यांची बहिण होती.१९२८मध्ये तिची भेट हिमांशू रॉय यांच्याशी झाली व १९२९ साली दोघे विवाहबद्ध झाले १९३३ला हिमांशू रॉय यांनी पहिला चित्रपट “कर्म” काढला.१९३४मध्ये रॉय यांनी बॉम्बे टोकीजची स्थापना केली.त्यानंतर रॉय यांनी जवानी कि हवा (१९३५) ममता और मै बीबी(१९३६) हे चित्रपट काढले.या चित्रपटात देविकाचा हिरो नज्म उल हसन होता.त्यानंतर १९३६ सालीच “जीवन नैया” चित्रपट सुरु केला हिरो होता नज्म उल हसन पण दरम्यान देविकाचे हसन बरोबर सुत जुळले व ती त्याच्या बरोबर पळून गेली.हिमांशू रॉयची पत्नी गेली हे जर बाहेर कळले तर त्यांची सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती म्हणून तिचा शोध घेतला व बाबा पुता करून हि बातमी बाहेर पसरायच्या आधी तिला परत आणली.त्या काळात घटस्फोट जवळजवळ अशक्य होता म्हणून तिने रॉय समोर प्रस्ताव मांडला कि रॉयने तिला वेगळा पैसा द्यायचा , जरी ते एकाच घरात रहात असले तरीही. रॉय तयार झाले कारण असे केले नाही तर समाजात त्यांना तोंड दाखवायला जागा उरली नसती आणि स्टुडिओ दिवाळखोरीत निघाला असता.
हिमांशू रॉय यांनी पाहिलं काम केलं नज्म उल हसन याला चित्रपटातून काढून टाकले. आता प्रश्न होता नायक कोण? चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक शशधर मुखर्जी म्हणाला “माझा मेहुणा कुमुदलाल गांगुली lab मध्ये काम करतो आपण त्याला हिरो बनवू आणि गांगुलीला तर हिरो बनायचं नव्हते. त्यांनी खूप आढेवेढे घेतले पण रॉय आणि शशधर मुखर्जी जिद्दीला पेटले होते कुमुदलाल गांगुलीला हिरो बनवायचाच. म्हणून त्याचे नामकरण अशोककुमार केले.अशोककुमारने खूप आटापिटा केला. रिहर्सलच्या वेळी बायकी हालचाली केल्या लिपस्टिक लावली जेणेकरून आपल्याला काढून टाकतील.पण त्यांना काम करावच लागलं. आजकाल हिरोच काम मिळावे म्हणून होतकरू कलाकार निर्माता , दिग्दर्शक यांचे जोडे झिजवतात पण अशोककुमार हे एकमेव असतील ज्यांनी हिरो बनू नये म्हणून आटापिटा केला असेल.त्या नंतर या जोडीने अछुत कन्या,जीवन नैया, निर्मला, सावित्री, जन्मभूमी, अंजान, वचन असे अनेक हिट चित्रपट केले.
हिमांशू रॉय यांच्या निधनानंतर बॉम्बे टोकीज फुटली शशधर मुखर्जी व अशोककुमार त्यातून बाहेर पडले.तरी देविका डगमगली नाही सहायक दिग्दर्शक अमिया चक्रवर्तीला घेऊन चित्रपट काढले १९४५ साली “ज्वारभाटा” काढला. त्यावेळी चक्रवर्तीने “युसुफ खान”नावाच्या एका फळविक्याला आणले. देविका म्हणाली हे नाव चालणार नाही म्हणून त्याचे दिलीपकुमार असे बारसे केले.काही काळानी तिने चित्रपट श्रुष्टीला रामराम केला.तिने रशिअन पेंटर “Swetolav Roerich” याच्याशी लग्न केले व बंगलोरला स्थायिक झाली. ९ मार्च १९९४ला तिचे निधन झाले.
तिचे चित्रपट कर्म ,जवानी कि हवा,ममता और मै बीबी, जीवन नैया,जन्मभूमी,अछुतकन्या, सावित्री, जीवन प्रभात,इज्जत,प्रेमकहानी,निर्मला,वचन,दुर्गा,अंजान हमारी बात.
— रवींद्र वाळिंबे
Leave a Reply