नवीन लेखन...

आम्लपित्त (ACIDITY) का होते ?

आम्लपित्त (ACIDITY) हा वरून साधा दिसणारा पण पण गंभीर आजार आहे. थोडी काळजी घ्या आणि आम्लपित्तापासून स्वत:ला वाचवा…

* अवेळी जेवण सकाळचे दुपारी-दुपारचे रात्री उशीरा

* रात्री ९-१० च्या नंतर जेवणारयांना हमखास आम्लपित्त होते.

* सकाळी उठल्याबरोबर चहा घेणारया व्यक्तींना आम्लपित्त असेल तर जगात कोठेही औषधी घेतली तर त्यांचे पित्त कमी होत नाही. म्हणुन आम्लपित्ताच्या रुग्णांनी सकाळी चहा घेऊ नये.

* ज्यांना पोट साफ होत नाही, मलबध्दता असते त्यांना देखील आम्लपित्ताचा त्रास होतो.

* जाहीरातीत बघुन पोट साफ होण्याची औषधी घेतल्यास देखील कित्येकांना आम्लपित्त होते.

* आहारामध्ये सतत पोहे, आंबविलेले पदार्थ जसे इडली-वडा-डोसा- उत्तप्पा खाणारे नागरिक, समोसा, कचोरी, वडापाव, पाणीपुरी-चाईनिज-इतर फास्ट फुड खाणारे, नित्यनियमाने मांसाहार करणारे, तिखट, मसाले, लोणचे, चटण्या, ठेसा खाण्यारयांना आम्लपित्त होते.

* सतत चिंताग्रस्त स्वभाव, रात्री जागरण, अपुरी झोप याने देखील आम्लपित्त होते.

* कौटुंबिक कलह, आर्थिक विवंचना असलेल्या लोकांना देखील आम्लपित्त होते.

* तंबाखु, चहा, कॉफी, सुपारी-गुटखा याच्या अतिप्रमाणातील सेवनाने आम्लपित्त होते.

* सकाळी ९-१० ला जेवण त्यानंतर रात्रीच ८-९-१० ला जेवण करणारयांना देखील आम्लपित्त होते.

* सतत काहीनां काही गोळ्या खात रहाणे यामुळे देखील आम्लपित्त होते.

* अतिकडक उपवास किंवा उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने पोटात अ‍ॅसिडिटी होते. शिळे अन्न खाल्लय़ाने पोटातले आम्लपित्त वाढते आणि गॅसेस व ढेकर येऊ लागतात.

— सुषमा मोहिते
Sushama Mohote

Avatar
About सुषमा मोहिते 34 Articles
सुषमा मोहिते या आरोग्यविषयक लेखन करतात. त्या “आरोग्यदूत” या WhatsApp ग्रुपच्या Admin पदाचीही जबाबदारी सांभाळतात.

1 Comment on आम्लपित्त (ACIDITY) का होते ?

  1. पोहे खाल्याने पित्त होते का? पोहे खाण्याची योग्य पद्धत कोणती?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..