मी ‘भ्रष्टाचार’ हा शब्द लहान पणापासून ऐकतो आहे. गेली ६० ते ६५ वर्षे माझा या शब्दाशी परीचय आहे. भ्रष्टाचार चांगला नाही हे जसे माझ्या मनावर बिंबवले गेले आहे तसेच राजरोजपणे चाललेला भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने पहायची सवय पण लागुन गेली आहे. हा भ्रष्टाचार पिढ्यान पिढ्या चालत आला आहे. अत्यंत भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचा क्रमांक बराच वरचा आहे याची जाणीव आहे. पण या भ्रष्टाचाराचे मूळ कशात आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न कोणी केलेला दिसत नाही. न्युझीलंडमधील गोन्डोझ येथील ब्रायन (Brian) नांवाच्या माणसाने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याला जे काही आढळून आले ते खाली सांगीतले आहे.
भारतीय लोक हे ‘होबेसियन’ (Hobbesian) म्हणजे स्वार्थी आहेत. ‘स्वार्थ’ हा त्यांच्या संस्कृतीचा पाया आहे. आपला स्वार्थ साधण्यासाठी या लोकांची कोणत्याही नीच पातळीवर जाण्याची तयारी असते.
भ्रष्टाचार हे भारतीय संस्कृतीचे अंग आहे. भारतीयांना याबद्दल खरोखरच लाज, लज्जा किंवा शरम वाटत नाही. त्यांना हा सगळा प्रकार अगदी किरकोळ वाटतो.
भारतीय लोक भ्रष्टाचारी लोकांना ‘करेक्ट’ करण्याऐवजी ‘टॉलरेट’ करत असतात.
कुठलाही धर्म किंवा संस्कृती मुळात भ्रष्टाचारी म्हणजे करप्ट नसते.
पण एखाद्या धर्माची संस्कृती त्या धर्माला भ्रष्टाचारी बनवू शकते?
भारतीय लोक भ्रष्टाचारी का आहेत याची खालील उदाहरणे बघा.
भारतीय धर्मामध्ये देवाण घेवाण मंजूर आहे.
भारतीय लोक देवाला पैसे देतात व त्या बदल्यात देवाने आपले इतरांपेक्षा काहीतरी चांगले करावे अशी अपेक्षा करतात.
याचा अर्थ देवाला पैसे चारल्याशीवाय देव आपले भले करत नाही अशी या लोकांची ठाम श्रद्धा असते.
देवळाच्या चार भिंतींच्या आत याला ‘दान’ असे म्हणतात पण देवळाच्या बाहेर याला ‘लांच’ असे म्हणतात.
श्रीमंत लोक तर देवाला नुसते पैसे देऊनच थांबत नाहीत तर सोने, नाणे, सोन्याचे दागीने, सोन्याचे मुकुट पण अर्पण करतात.
त्यांच्या या दानाचा तसा समाजाला काहीच उपयोग होत नसतो. त्याने काही गरीबाच्या पोटात अन्न जात नाही, बेरोजगारी कमी होत नाही की उत्पन्नात वाढ होत नाही. उलट गरीबाला अन्न देण्यासाठी पैसे खर्च करणे म्हणजे पैसे वाया घालवणे असे समजले जाते.
सन २००९ साली कर्नाटकतल्या जी. जगन्नाथ रेड्डी नांवाच्या एका मंत्र्याने तिरुपतीला ४५ कोटी रुपयांचे सोन्याचे दागीने, सोन्याचा मुकुट व हिरे दान दिले म्हणून त्यांचा गौरव झाला होता व ही बातमी ‘द हिन्दु’ सारख्या एका प्रसिद्ध व प्रतिष्ठित वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर भल्या मोठ्या ठळक अक्षरात प्रसिद्ध झाली होती.
भारतातील मंदीरांना एवढी संपत्ती मिळते की त्याचे काय करायचे हे त्यांना समजत नसते. अशी कोट्यावधी नव्हे तर अब्जावधी रुपयांची संपत्ती या मंदीरांच्या तिजोरीमध्ये वर्षानुवर्षे धूळ खात पडून आहे. (महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळत आहे. पण एकाही मंदीराने त्यांची तिजोरी दुष्काळग्रस्तांसाठी उघडून दिल्याचे निदान मला तरी माहीत नाही.)
जेव्हा युरोपियन लोक भारतात आले त्यांनी शाळा बांधल्या. जेव्हा भारतीय लोक युरोप किंवा अमेरिकेत जातात ते मंदीरे बांधतात.
भारतीय लोकांना वाटते की जर देवाने कृपा करण्यासाठी पैसे स्विकारले तर त्यात चुकीचे काहीच नाही. मग काही खास काम करून देण्यासाठी इतरांनी पैसे स्विकारले तर काय झाले? थोडक्यात भारतीय माणसाला सहज भ्रष्टाचारी बनवता येते.
भारतीय संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या व्यवहाराला संमती आहे. हा संस्कृतीचाच एक भाग समजला जातो. कोणीही या विरुद्ध आवाज उठवत नाही. कोणी आवाज उठवलाच तर त्याला ‘धर्मभ्रष्ट’ समजण्यात येते. जयललीता सारखी भ्रष्टाचाराची महाराणी असलेली महीला परत परत निवडणूका जिंकुन मुख्य मंत्री होऊ शकते. हे फक्त भारतातच होऊ शकते. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर अशा गोष्टी घडूच शकत नाहीत.
भारताचा इतिहास हा अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराने बजबजलेला आहे. अनेक शहरे व अनेक राज्ये केवळ भ्रष्टाचाराच्या मार्गाने जिंकली गेलेली आहेत. रात्रीच्या पहारेकर्यांना पैसे चारून त्यांना वेशीची दारे रात्री उघडायला सांगून आणि शत्रुच्या सेनापतींना शरण येण्यासाठी पैसे चारून अनेक लढाया जिंकल्या गेल्या आहेत.
हे फक्त भारतातच घडू शकते.
यामुळे भारतामध्ये ज्याला रक्तरंजीत किंवा अतीतटीच्या लढाया म्हणता येतील अशा लढाया फारच थोड्या झाल्या. पुर्वीचे ग्रीस किंवा अलिकडच्या युरोपच्या मानाने भारतातील लढाया अगदीच किरकोळ होत्या.
तुर्की सैनीकांची नादीर शहाबरोबर झालेली लढाई खरी लढाई होती.
भारतामध्ये युद्ध जिंकण्यासाठी मर्दुमकिची नव्हे तर शत्रुला पैसे चारण्याच्या कौशल्याची आवश्यकता होती. केवळ पैशांच्या जोरावर भारतावर आक्रमण करणार्या अनेक आक्रमकांनी मोठमोठ्या राजे महाराजांचा पराभव केला आहे, त्यांच्याकडे प्रचंड मोठे सैन्य असताना सुद्धा.
प्लासिची लढाई हे याचे उत्तम उदाहरण आहे. या लढाईत ब्रिटिश सैन्याला फारच किरकोळ संघर्ष करावा लागला. कारण लॉर्ड क्लाइव्हने आधीच मीर जाफरला भरपूर पैसे चारले होते व त्यामुळे भली मोठी बंगाली फौज केवळ ३००० सैन्य असलेल्या ब्रिटिश फौजेला सहज शरण गेली.
किल्ले जिंकण्यामध्ये नेहमीच काही आर्थिक व्यवहार व्हायचे. सन १६८७ साली रात्री गुप्त दार उघडे ठेऊन गोवळकोंड्याचा किल्ला असाच शत्रुने जिंकला होता.
मोगलांनी सुद्धा मराठ्यांचा व रजपुतांचा नायनाट केला तो भ्रष्टाचाराच्या जोरावर.
श्रिनगरच्या राजाने दारा शिखोचा मुलगा सुलेमान याला औरंगजेबाच्या स्वाधीन केले ते सुद्धा भली मोठी लाच खाल्यावर.
भ्रष्टाचारामुळे आपल्याच लोकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची अशी अनेक प्रकरणे भारतीय इतीहासात ठासून भरलेली आहेत.
इतर संस्कृतीमध्ये देवाण घेवाणीला संमती नसताना भारतीय संस्कृतीमध्येच अशी संमती का?
आपण सगळे जण जर सत्याने वागलो तर आपला उद्धार होईल यावर भारतीयांचा विश्वास नाही कारण तशी त्यांच्या धर्माची किंवा पंथाची शिकवण नाही.
जातीपातीने भारतीय समाजाला अलग केलेले आहे.
सर्व माणसे एक समान असतात यावर भारतीयांचा विश्वास नाही.
त्यामुळे त्यांच्यात फूट पडली आहे व अनेकांनी धर्मांतर केले आहे.
हिन्दु धर्म भक्कम करण्याऐवजी अनेक हिन्दुंनी स्वतःचे धर्म किंवा पंथ सुरू केले-जसे की शिख, जैन, बुद्ध. बर्याेच हिंदुंनी ख्रिश्चन धर्म किंवा इस्लाम धर्म स्विकारला.
याचा परिणाम म्हणजे भारतीयांचा एकमेकांवर अजीबात विश्वास नाही.
भारतामध्ये एकही भारतीय नाही. भारतामध्ये हिन्दु, मुस्लीम, ख्रिश्चन व इतर सतरा अगड पगड जातीचे लोक आहेत पण भारतीय एकसुद्धा नाही.
४०० वर्षांपूर्वी आपण सारे एकाच धर्माचे होतो हे भारतीय लोक विसरून गेले आहेत.
या फुटीरवादामूळे भारतामध्ये एक रोगट व भ्रष्टाचारी संस्कृती आस्तीत्वात आली आहे. प्रत्येकजण हा प्रत्येकाचा शत्रु आहे- फक्त देव सोडल्यास. पण हा देव सुद्धा भ्रष्टाचारीच आहे.
थोडक्यात भ्रष्टाचाराचे मूळ हे भारतीय लोकांच्या घराघरात, मंदीरात व संकृतीमध्ये आहे.
—-
अनेकांना ब्रायनचे विचार पटणार नाहीत हे मला ठाऊक आहे. पण त्याने आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?
श्री. दिपक कणगलेकर यांच्या सौजन्याने
उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
Leave a Reply