MENU
नवीन लेखन...

अशी घेतली शंकर महाराजांनी समाधी

मिती वैशाख शु. ८ (दुर्गाष्टमी ). शंकर महाराजांचा समाधी दिन !
समाधीस्थानाचा तो अनोखा स्पर्श.

पुण्यातील स्वारगेटकडून कात्रज कड़े जाणार्‍या रस्त्यावर , स्वारगेट पासून दोन अडीच किलो मैलावर डाव्या हाताला एक मठ लागतो . हाच सदगुरू श्री शंकर महाराजांचा मठ !

शंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटे पारायण अष्टमी पासून सुरु करायला सांगितले. सप्तमीला एक कप चहा घेतला. एका खोलीत छोटी गादी घातली .एक तक्या ठेवला आंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या. मी कोणाला भेटणार नाही. मला बोलायचे नाही. कोणी आले तरी दर उघडू नका. सकाळी ठीक १० वाजता महाराज खोलीत गेले. ढेकणे मामीनी दार लावून घेतले. दाराजवळ दोघे पहारा देत होते. रात्रभर ढेकणे मामा मामी घोंगडीवर बसून होते. पहाटे आतून आवाज आला. माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे. पुढील सोय करा. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला. संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तांचे लोंढे धावत आले. भक्तांना रडू आवरे ना. न्यायरत्न विनोद तांब्याची तर घेवून आले. त्यांनी एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरे टोक कानाला लावले. त्यातून आवाज आला. आत्मकलेपैकी एक कला जगकल्याणासाठी समाधी स्थानांत सदैव राहील. आणि माउलीचा आशीर्वाद जो जे वंचील तो ते लाहो प्राणिजात . ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला. आळंदी, जंगली महाराज, माळी महाराज, सोपानकाका, ओमकारेश्वर व पद्मावती या श ठिकाणचे निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे. ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेवून अडीज तासात निर्माल्य आणले. मामा ढेकणे व मामी यांना दु:खाचा वेग आवरेना. त्यांच्या घरापासून काका हलवाई दत्त मंदिर ग्लोब सिनेमा, अक्कलकोट स्वामी मठ, मंडई, शनिपार पर्वती, अरणेश्वर, पद्मावती आणि शेवटी मालपाणीच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंतयात्रा आली. भस्मे काका, दादा फुलारी, डॉक्टर शुक्ला , डॉक्टर घनेश्वर या चौघांनी महाराजांचा देह खांद्यावर घेवून समाधीच्या जागेपर्यंत आणला. त्या वेळी दादा फुलारीना शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपराने धक्का दिला व म्हटले अरे मला निट धर. फुलारी दादांनी दचकून महाराजांकडे पहिले. समाधीत ठेवताना मारुती माळी महाराजांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांना ते बजरंगबलीच्या रुपात दिसले त्यावेळी माळी महाराज म्हणाले भक्तीच्या वाटा जगाला दाखवण्यासाठीच आपण हे रूप घेतले काय ? सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधी गुफेत ठेवले. अनंतकोटी ब्रह्म्हांडनायक राजाधिराज योगीराज सदगुरू श्री शंकर महाराज कि जय अश्या घोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आसमंत निनादून गेला. ( वरील हे वर्णन ज्ञाननाथजीच्या पुस्तकातील आहे. )

समाधीत ठेवल्यावर बाबुराव रुद्र त्या समाधीच्या रात्रो त्या घनदाट अंधारात भयाण जंगलात न घाबरता समाधी सोबत राहिले. सारी भक्त मंडळी घरी निघून गेली. महाराजांच्या तीन पादुकांपैकी एक समाधी मंदिरात एक सोलापूरच्या जक्कलांच्या मळ्यातील दत्त मंदिरात व एक सोलापूरच्या शुभराय मठात ठेवली. प्रथम समाधी बांधली गेली नंतर एक पत्र्याची शेड असे करता करता असे आजचे भव्य दिव्य समाधी मंदिर उभे राहिले.

आजही मनोभावे हाक मारली असता समाधी घेतलेले शंकर महाराज समोर उभे राहतात हे खास वैशिष्ट्य आहे. आपली लीला आजही कश्या प्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही. अनेकांना याचा अनुभव आला आहे. आणि तसे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

शंकर महाराजांचे समाधी नंतरचे अस्तित्व –

शंकर महाराज समाधी घेतल्या नंतर सुद्धा भक्तांना भेटू लागले. स्वप्नात जाऊन मार्गदर्शन करू लागले. एका भक्ताला कुंपणाजवळ दर्शन दिले. व एका भक्ताला समाधी मठात विराट रुपात दर्शन दिले. १९४५ साली दिगंबर सरस्वती राजयोगी अन्ना महाराजांच्या दर्शनास गेले असता मी २१ वर्षांनी तुझ्याकडे दर्शनास येईन असे सांगितले होते. १ ९ ६ ६ साली वाघोड ला उत्सवात शंकर महाराज भेटले त्यांना घेवून रावेर येथे आले. तेथे सर्वांनी पाद्यपूजा केली. नैवेद्य दिला. वाजंत्री आणली. अन्ना महाराज व वाघोडकरांचा अष्टभाव जागा झाला. नंतर त्याच्या घरी मुंबईला महाराजांना आणले. त्याच्या उपस्थितीत श्री अनंत काळकर व जयश्री इखे यांचा साखरपुडा झाला त्यावेळी शंकर महाराजांनी त्याच्या सासर्याला टोपी व रुमाल भेट दिला आणि ते निघून गेले. त्या दिवसापासून घरची परिस्थिती चांगली झाली. आज मुलुंड येथे टोपी व रुमाल श्री रमेश इखे यांच्या घरी जपून ठेवला आहे. सौ. उमाताई व श्री शंकरराव नेरुरकर (आयडियल बुक डेपो कंपनी चे मालक ) हे दोघे १ ९ ८ ९ साली श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी रात्रो २ वाजता बोरीवली येथे L. I .C. कॉलोनी येथून घरी येत असता दाट अंधारात गर्द झाडीतून अचानक श्री शंकर महाराज बाहेर आले. सिगारेट व माचीस घेवून झाडीत अदृश्य झाले. असा हा अनपेक्षित प्रसंग पाहून दोघे स्तब्ध होवून पहात राहिले. धनकवडीच्या समाधीचा परिसर पूर्वी जंगलाचा होता. वाघ नेहमी येत. पण कोणाला कसलीही इजा झाली नाही. एका भक्ताला रात्रो समाधीतून बाहेर येउन दर्शन दिले. महाराज समाधीतून बाहेर आले व आपला पाय हंडीपर्यंत नेउन हंडी हलवली. हे अभ्यंकरानी समाधी नंतर ३ वर्षाने अष्टमीच्या रात्री पहिले. अभ्यंकरांची मुलगी आजारी असताना महाराज घरी आले व अभ्यंकराना भेटले. टोपी चपला सोडून संडासात गेले. लगेच त्यांनी चप्पल टोपी पेटीत लपवून ठेवल्या बराच वेळाने संडासात पहिले तर महाराज तिथे नव्हते. व पेटीतील लपवून ठेवलेली चप्पल टोपी नाहीशी झाली. पुण्याच्या लाकडी पुलावर एका माणसाला शंकर महाराज नावाने एक माणूस भेटत असे. गप्प चालत असे. मी धनकवडी ला राहतो म्हणून सांगत असे दोन दिवस शंकर महाराज आले नाहीत म्हणून तो शोधत धनकवडीला मठ्ठात आला. बाबुराव रुद्रानी महाराजांची समाधी दाखवली. तो गृहस्थ समाधी समोर पाया पडून निघून गेला. सोलापूर दक्षिण कसबा पेठेत राहणारे श्री दादा फुलारी सौर्गावकर यांना महाराजांनी समाधी नंतर त्याच्या घरी जावून चहा व सिगारेट अंगावरचा सदरा व पायजमा मागितला तो दिल्यावर चल माझ्या बरोबर असे सांगितले. सौर्गावकर गेले नाहीत. पण त्या नंतर ८ दिवसांनी सौर्गावकरांनी देह ठेवला. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा महाराज म्हणत माझ्या गुरूचा जप आहे. माझा गुरु व मी वेगळा नाही. जो माझ्या गुरुचा जप करेल त्याचे सर्वच मनोरथ पूर्णच करावयाची जबाबदारी माझी राहील. माझे स्मरण करा. व माझा अनुभव घ्या. महाराजांची वक्तव्ये आजही खरी ठरतात.

!!श्री स्वामी समर्थ !!
!! जय शंकर !!

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..