
मुंबईच्या दोन मित्रांनी पंढरपूरला जाऊन एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला व पंढरपूरला पोहचले.
मंदीराजवळ आल्यावर दिसले की तिथे प्रचंड गर्दी, रांगाच्या-रांगा लागल्या होत्या. पहिला मित्र लगेच गर्दीतून कसे आत घूसता येईल त्यावर विचार करायला लागला व त्याप्रमाणे त्याने वाट काढत , स्वत:चे पैशांचे पाकीट सांभाळत, गर्दीतल्या लोकांची बोलणी खात, लोकांच्या हाताचे कोपरे व पायांचे ढोपरे झेलत कसा बसा कोणावर ओरडत मुर्तिसमोर पोहचला. एक क्षण मुर्तिसमोर नजरानजर होत नाही तर दुसऱ्याने त्याला जवळजवळ ढकलले आणि त्याचा परतीचा प्रवास तसाच सुरु झाला व दुसऱ्या मित्राजवळ आला, तो मित्र उभा होता तेथेच वारंवार जमिनीवर साष्टांग नमस्कार घालत होता व पुन्हा डोळे मिटून शांतपणे कळसाकडे बघत होता. मध्येच दोन्ही हात आकाशाकडे वर करून काही प्रार्थना करत होता.
ह्या यात्रेचा लाभ खरा कोणाला झाला तर बरेच अभ्यासू वृत्तीचे लोक म्हणतील की, ज्या मित्राने मुर्तीचे दर्शन घेतले नाही त्याला झाला.
हो हे अगदी खरे आहे. यासाठी आभामंडळाचे विज्ञान हा विषय समजवून घ्यावा लागेल. अतिप्राचीन काळी म्हणजे सुमारे 25 सहस्त्र वर्षांपुर्वी आपल्या ऋषीमुनींनी मानवी देहाचे व विश्वाचे रहस्य लिहून ठेवले आहे. विश्वाच्या उत्पत्ती मध्ये प्रचंड ऊर्जेचा स्फोट झाला व याचे तापमान थंड होताना दृश्यमान ग्रह व तारे जन्माला आले. परंतू या विश्वात उर्जातरंगाचे अस्तित्व आहे. त्यापैकी आपल्याला क्ष किरणे, सोनोग्राफी, मायक्रोव्हेव, रेडिओ, टेलिव्हिजन, मोबाईल फोन ह्या उर्जातरंगांचा आपण अभ्यास केल्यामुळे ह्या गोष्टी आपण दैनंदिन व्यवहारात वापरतो. त्याचे घातक परिणाम आपल्याला माहित आहे. आपण सुध्दा या उर्जातरंगांचा एक भाग आहोत. आपल्या भोवतीसुध्दा उर्जातरंग आहे. आपल्या भोवतीच्या प्रत्येक गोष्टीची उर्जाकंपन आपल्या अस्तित्वाचा स्तर ठरवित असतात. क्वांटम फिजिक्स म्हणजे विश्व चैतन्य अत्यंत सुक्ष्म थरावर कार्य करते. Electron पेक्षा 1/4 सुक्ष्म कण म्हणजे Quantas, Leptons, Subatomic Particles अशी त्यांची नावे आहेत. यथे सजातीय धृव आकर्षित होतात, विजातीय धृव वेगळे होतात. ऋण किंवा नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती आकर्षित होतात, हे समजते.
आपल्याकडील सर्व देव देवता या ऊर्जा स्त्रोताचा एक भाग आहे. परंतू सगुण भक्ती सोपी असल्यामुळे ह्या उर्जेच्या स्त्रोतांना नाव मिळाली आहेत.
आपल्याला दृश्यमान असलेले शरीर हे अन्नमय कोष असून प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोष हे अदृश्य किंवा सूक्ष्म देहाचे घटक आहेत. हे सुक्ष्म शरीर आपले भौतिक शरीर चालवते. म्हणून सुक्ष्म देहाचा अभ्यास हा आरोग्याचा तसेच अध्यात्मिक प्रगतीचा अभ्यास समजला जातो. सूक्ष्म देहामुळे आपल्या स्थूल / भौतीक / इंद्रिय देह अन्नमय कोषाशी वाढ व नियंत्रण होते. आपल्या मानसिक, भावनिक, आणि अध्यात्मिक प्रगतीसाठी हा कारणीभूत असतो आणि अंतराळातील सूक्ष्म लोकांशी -सूक्ष्म सृष्टीशी हा देह सतत संपर्कात असतो. ह्या सुक्ष्म शरीरावर वैश्वीक उर्जेचा सतत परिणाम होत असतो. या सूक्ष्मदेहांभोवती एक तेजोवलय आहे. पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी प्रवास करताना त्यांच्याभोवती असलेल्या जनसमुदयातील व्यक्तींना त्यांच्या डोक्याभोवती दिव्य तेजोवलय दिसत असे. ह्यांच्यातील काही चित्रकार, मुर्तिकार यांनी आपल्या कलेतून ते साकार केले आहे. म्हणून आजही प्राचीन मुर्तिभोवती देव-देवता, संत, सद्गुरु ह्यांच्याभोवती तेजोवलय दाखविण्यात येते.
आपण सुध्दा ह्या वैश्वीक ऊर्जेचे घटक आहोत आणि ह्या ऊर्जातरंगाचा परिणाम आपल्या सूक्ष्मदेहातील 7 प्रमुख चक्र व 72,000 नाड्यांमार्फत होत असतो. गाढ झोपेत किंवा ध्यानामध्ये जेव्हा आपले मन निर्मन अवस्थेत असते तेव्हा ही उर्जा आपली आदल्या दिवशीची झीज भरून काढते व आपण फ्रेश होतो. परंतू अति वैचारिक, भावनिक परिस्थितीमध्ये ही उर्जा ग्रहण करता येत नाही. आपला दुसरा दिवस त्रासलेला जातो. ह्याचा परिणाम म्हणून ही उर्जा ऊर्जा वाहक नाड्यांमधून नीट प्रवाही होत नाही. आपल्या अवयवांना नीट कार्यशक्ती मिळत नाही. त्यांच्या कार्यात दोष निर्माण होतो व आपल्याला रोगाची लागण झाली असे गृहीत धरले जाते.
चांगल्या विचारांची उर्जा सकारात्मक……..
गेली 300 वर्ष रशिया, जर्मनी आणि युके मध्ये यावर खूप अभ्यास सुरु आहे. यातील सी डब्लू लेडबीटर, सर गीटचेल, अॅनी बेझंट, किर्लीऑन यांनी या विषयावर पूस्तके लिहिली आहे. परदेशातील यापैकी काहींनी भारतातल्या गुहेमध्ये राहणाऱ्या ऋषींबरोबर संपर्क साधून हा विषय संस्कृत मधून समजून घेतला व आपल्या देशात जाऊन त्यांच्या भाषेत ग्रंथातून हा विषय मांडला, त्यामुळे तेथील अनेक शास्त्रज्ञ या विषयाकडे आकर्षित झाले.
डॉ. किरली ऑन यांनी 1949 चे सुमारास किरलीअन फोटोग्राफी शोधून काढली. सर हॅरि ओल्डफिल्ड यांनी 1979 मध्ये पॉलीकॉनस्ट्रास्ट इन्टरफेरन्स फोटोग्राफीचा (PIP) विकास केला. शरीराच्या चुंबकीय ऊर्जेमुळे शुध्द पांढऱ्या प्रकाशाचे पृथ:करण होऊन विविध रंगांच्या छटा बघण्याची ही प्रणाली आहे. PIP फोटोग्राफीने हे सिध्द केले आहे की कोणताही रोग शरीरात कुठे आहे हे दिसण्यापूर्वी तो आभामंडळावर स्पष्ट दिसतो. आजार हे शरीराला पुरवल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या असंतुलनामुळे झालेले असतात. दुर्लक्षित आजाराचे रुपांतर मोठ्या व्याधीत होते.
डॉ. अनुप देव, ठाणे
खुपच चांगला लेख.