नवीन लेखन...

काय आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य?

1972 चा काळ अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांचा होता. त्या वेळी त्यांची दृष्टी पडली माऊलींच्या समाधी वर, संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोर शास्त्रज्ञ आर एन शुक्ल यांनी सांगितली ती अशी…

त्यावेळी वारकरी सांप्रदायाची थोर व्यक्ती ह.भ.प मामासाहेब दांडेकर हे होते त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला आळंदीची समाधी उखडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मुलन चे लोक येत आहेत, त्यांचे असे म्हणणे आहे कीजर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या
शरीरातील हाडे तरी सापडतील. मामासाहेबां समोर खुप मोठा प्रश्न पडला होता यांना रोखायचे कसे त्यावेळी शुक्ल साहेब यांनी मामासाहेबांना सांगितले
माऊली पाहुन घेतील.

दुसरा दिवस उजाडला सकाळीच दोन अडिचशे माणसांचा ट्रक पुण्याहुन आळंदीला जाणार आहेत असे समजल्या वर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर व शास्त्रज्ञ शुक्ल साहेब आळंदीला पोहचले होते.

शुक्ल साहेबांनी सोबत तीन मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता गीगरम्यूलर काऊंटर त्यात एक्सरे अल्फा, गॅमा, बीटा नावाचे जे किरण किंवा उर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाहीत हे शोधून काढु शकतो. ते मीटरवर दाखवले जाते. त्याला गीगरम्यूलर स्किंटीलेशन काऊंटर असे नाव आहे.

तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पासून सहा फुट अंतरावर ठेवला.

दुसरा मीटर ज्याला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात. तो घेतला होता. त्याने अल्ट्राव्हायोलेट इन्फारेड आहेत की नाही हे पहाता येते. तो ही मीटर समाधी जवळ ठेवला.

तिसरा फ्रिक्केन्सी मीटर रडार हा मीटरही त्या ठिकाणी ठेवला.

तोपर्यंत अंधश्रद्धावाली मंडळी डाॅक्टर, दोन तीन इंग्लीश माणसे, घोषणा देतच मंदिरा पर्यंत पोहचली.

सर्व जमावाला दाराजवळच मामांनी थांबवले आणि सांगितले समाधी बद्दल आम्ही जे सांगतो तो प्रयोग करा. आणि मग तुमचे काम करा.

तो पर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी तीन वेष्टणे आणली होती. एक जस्ताचे, एक पितळेचे आणी एक लोखंडाचे.

शुक्ल साहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले या ठिकाणी तीन मीटर्सही ठेवले आहेत.समाधी वर एकेक झाकण टाकून मीटरवर काय दिसते ते पाहावयाचे आहे. तुम्ही पहाल त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही. बाहेर थांबू.

त्यांच्यातील दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना गाभा-यात घेतले आणि त्यांना माहिती देऊन मामा व शुक्ल साहेब गाभा-याबाहेर निघुन आले. आम्ही सांगितल्या प्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला.

लोखंडी, पितळी, जस्ताचे आवरण काढल्यावर एकच ठराविक रिडींग मीटर दाखवायचे. आत कोणी नसल्याने काटा हलविण्याचा प्रश्न चनाही. त्या लोकांन पैकी कोणी मीटरला हात लावत नव्हते मग काटा रिडींग का दाखवीत आहे. रिडींग दाखविणारे चैतन्य स्फुरणस्पंदने कोठून येत आहेत असा गहन प्रश्न अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांना पडला. यामध्ये कसलाच जादुटोणा हातचलाखी नव्हती हे त्यांच्या लक्षात आले.

शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखविल्यावर त्यांच्या लक्षात आले संजीवन समाधी म्हणजे काय? हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चित पणे चैतन्य आहे. उर्जा आहे, स्पंदने आहेत,म्हणून च त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. चैतन्य दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व असते. क्ष किरण दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. तसेच संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेच त्यांचे अस्तित्व मनुष्यच काय विज्ञान सुद्धानाकारू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दुर झाल्या नंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्याला समाधी च्या दर्शनाला येवु लागली. तीन परदेशी नागरिकां पैकी एकाने स्वताला आळंदीला वाहून घेतले. पुन्हा कधीच कुणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केले नाही.

वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु ह.भ.प. मामासाहेब दांडेकरांनी आलेल्या सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या सदस्यांना पुन्हा एकदा संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन सांगताना म्हणाले एखाद्या साधु संत संजीवन समाधी घेतो, तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तोपंचमहाभूतात्मक होतो. शरीर पृथ्वी आप तेज वायु आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो संजीवन समाधीत उतरतो तेव्हा तो सजग असतो. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते. निर्देही होते याचा अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी आप तेज वायु हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रम्हांडातील पृथ्वी आप तेज वायु आकाश यात एकरूप होऊन जातात. त्यामुळे समाधी च्या जागी काहीही शिल्लक रहात नाही.

— संजीव थोरात. 
पुणे

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..