टायटॅनिक हे जहाज १० एप्रिल १९१२ रोजी इंग्लंडमधील साउथ हँप्टन येथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे सफरीला निघाले. ४ दिवसांनी १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर रात्री म्हणजेच १५ एप्रिल १९१२ रोजी पहाटे उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडाले. हे जहाज कधीच बुडू शकत नाही असा त्याच्या निर्मात्यांचा दावा होता. टायटॅनिक हे त्या काळचे सर्वात मोठे प्रवासी वाहतूक करणारे जहाज होते. त्याची लांबी तब्बल २८९ मीटर्स इतकी होती. आणखी एक विशेष बाब म्हणजे, त्या काळातली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणारी ती जगातली सर्वात मोठी मानवनिर्मित वस्तू होती.
टायटॅनिकची बांधणी करण्यासाठी तीन वर्षे लागली होती. अधिकृत आकडेवारी नुसार त्या दिवशी टायटॅनिक वर २,२२५ लोक प्रवास करत होते. त्यात १३१७ हे प्रवासी होते तर ९०८ लोक जहाजाचे कर्मचारी होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एवढ्या लोकांपैकी फक्त ७१३ जणांचे जीव वाचवण्यात यश मिळाले. टायटॅनिकवरून वाचलेली शेवटची जिवंत व्यक्ती होती मिलविना डीन नावाच्या बाई. टायटॅनिक बुडाले तेव्हा त्यांचे वय फक्त २महिन्याचे होते. मिलविना यांचा मृत्यू वयाच्या ९७ व्या वर्षी २००९ मध्ये झाला. आज टायटॅनिक जहाज दोन तुकड्यांच्या रुपात समुद्राच्या तळाशी चिरविश्रांती घेत आहे. ही जागा न्यू फाउंडलँडच्या किनाऱ्यापासून ३७० मैल दूर आहे. समुद्राच्या पृष्ठभागाखाली अडीच मैल खोलवर टायटॅनिकचे अवशेष आहेत. या खोल जागी प्रकाश पोहोचू शकत नाही आणि कुठलाही प्राणी जिवंत राहू शकत नाही. या घटनेवर टायटॅनिक सिनेमा बनवला गेला. या सिनेमाचे एकूण बजेट हे खुद्द टायटॅनिक जहाजापेक्षा कितीतरी जास्त होते. टायटॅनिक जहाज बनवायला ७५ लाख डॉलर्स खर्च झाले होते तर सिनेमा बनवायला २० करोड डॉलर्स लागले. कमाईच्या बाबतीत टायटॅनिक सिनेमा जगात पहिल्या स्थानावर होता.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply