नवीन लेखन...

लाकडी स्लिपरऐवजी सिमेंटचे स्लिपर घाालणे केव्हा सुरू झाले ?

दोन रेल्वे रुळांमधील अंतर सारखे राहण्यासाठी स्लिपर्सचा वापर केला जातो. सर्वात प्रथम लाकडी स्लिपर वापरले गेले. डॉग स्पाईक नावाच्या मोठ्या खिळ्यांनी त्यावर रूळ बसविले जायचे. या स्लिपरचे आयुष्य दहा ते १५ वर्षांचे असते. हळूहळू लाकडी स्लिपरऐवजी स्टील स्लिपर अथवा कास्ट आयर्न स्लिपरचाही वापर सुरू झाला.

जसजशी रेल्वे प्रणालीमध्ये सुधारणा होत गेली तसतसे या गोष्टींचेही आधुनिकीकरण करण्याची जरूर भासू लागली. कारण या स्लिपर्स अतिवेगाने जाणाऱ्या गाडयांसाठी कमकुवत ठरु लागल्या. त्यामुळे भारतीय रेल्वे बोर्डाने तज्ज्ञांची एक समिती नेमली. त्यांनी कॉंक्रिटचे स्लिपर्स वापरण्यासंबंधी सूचना केली. लाकडी स्लिपरऐवजी काँक्रिटचे स्लिपर वापरण्याने जंगलतोड वाचणार होती आणि ट्रकचे आधुनिकीकरण पुढे नेता आले असते.

अशा तऱ्हेने १९६४-६५ च्या सुमारास हे स्लिपर्स प्रायोजिक तत्वावर वापरणे सुरू झाले. काँक्रिट स्लिपर्सचे आयुष्य ५० वर्षांचे असते. त्यामुळे खर्चात बचत झाली.

काँक्रिटच्या स्लिपर्समध्येही दोन प्रकार होते. एका प्रकारात दोन ब्लॉक होते. ते एका लोखंडी पट्टीने जोडावे लागायचे. तर दुसरा सलग ब्लॉक लाकडी स्लिपरप्रमाणे असे. नंतर त्यात सुधारणा करुन प्रीस्ट्रेस्ड काँक्रिटच्या स्लिपर्स बनवल्या गेल्या. काँक्रिटच्या स्लिपर्स अधिक ताकदवान असून वजनाने हलक्या असतात.

१९८०-९० मध्ये सुप्रीम कोर्टाने लाकडी स्लिपर्स वापण्यावर बंदी आणली. त्यामुळे आता भारतीय रेल्वेमध्ये सर्वत्र नव्या स्लिपर्स काँक्रिटच्याच वापराव्या असा दंडक आहे.

आता हळूहळू मुख्य मार्ग, मग दुय्यम मार्ग अशा तऱ्हेने लाकडी, लोखंडी व स्टील स्लिपर्स काँक्रिटच्या स्लिपर्सने बदलले जात आहेत.

कोकण रेल्वे ही पहिल्यापासून १५० किलोमीटर वेगाने गाडया जातील अशा हिशेबाने त्यातील सर्व यंत्रणा तयार केली असल्याने तेथे पहिल्यापासूनच काँक्रिटचे स्लिपर्स वापरले गेले आहेत.

आता भारतात मालाच्या वाहतुकीसाठी दिल्ली-कोलकता आणि मुंबई-दिल्ली असे दोन स्वतंत्र मार्ग बनविले जात आहेत. त्यांच्यासाठी आणखी शक्तिशाली आणि प्रभावी स्लिपर्स लागणार असून तसे ते बनविले जातील.

लाकडी स्लिपरऐवजी सिमेंटचे स्लिपर घाालणे केव्हा सुरू झाले ?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..