नवीन लेखन...

‘The wall’ on the wall… आणि मी

किती जादुई असतात नाही ही छायाचित्र! जुने फोटो आपल्याला आठवणींच्या विश्वात चटकन घेऊन जातात..लाखो क्षण, मिनिटे , तास,
दिवस तसंच कित्येक वर्षांचा काळ झपकन पार करवून आपल्याला मागे घेऊन जाण्याची ताकद असते बरं फोटो मधे!..मला तर जुने फोटो बघणं stress buster वाटतं ..फोटो बघत बसलं की आपण आपोआप त्यात रमतो, वेळ चांगला जातो आणि या सगळ्यात आपला ताण कधी हलका होतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही..

एक असाच आठवणीतला फोटो सापडला ..इयत्ता ६ वीत असतानाच्या या माझ्या फोटोत अजून एक फोटो आहे. भारतीय क्रिकेट विश्वाला लाभलेला एक अद्वितीय खेळाडू असा त्याचा उल्लेख केला तर निश्चितच वावगं ठरणार नाही…चायना कडे जरूर त्यांची ग्रेट वॉल असेल मात्र आमची the great Indian wall, Mr. Dependable म्हणजे राहुल द्रविड. क्रिकेट बद्दलचं माझं ज्ञान अतिसामान्याहूनही अतिसामान्य आहे, मात्र एवढं नक्की ठाऊक की test player ला glamour मिळवून दिलं ते राहुल द्रविड ने.

या फोटो मागची आठवण मोठी मजेशीर आहे. साल होतं १९९८, नाशिक.. राहुल द्रविड चं जबरदस्त fan following होतं माझं ..द्रविडचे फोटो गोळा करणं हा आवडता छंद..आई आणि मी ज्या वाचनालयात जायचो तिथे हे पोस्टर लावलं होतं. अगदी छोटंसं वाचनालय होतं , टपरीच्या आकाराएवढं..एकदा आईसोबत गेले असता हे poster दिसलं. माझी भुण-भुण सुरु झाली, आईला म्हटलं लायब्ररीतल्या काकांकडे माग ना गं ते पोस्टर ..मात्र असं काहीही फुकट मागून घेणं तिला पटणारं नव्हतं . मी कसला तरी हट्ट करतेय हे बहुदा त्या काकांच्या लक्षात आलं मात्र तेव्हा माझ्या देखत त्यांनी काही विचारलं नाही . खिन्न होऊन मी तिथून निघाले खरं पण सगळं लक्ष त्या poster कडेच होत. मधे काही दिवस निघून गेले असतील कदाचित. अशीच एक दिवस आई बाहेर जाऊन आली आणि मला म्हणाली ,” तुझ्यासाठी surprise आहे.” राहुल द्रविड चं ते poster तिच्या हातात होतं . त्या दिवशी लायब्ररी च्या काकांनी आमचं बोलणं ऐकल्यामुळे आपणहूनच ते पोस्टर माझ्याकरता म्हणून आईकडे दिलं . मग काय माझ्या आनंदाला पारावार नव्हता. लगेच घरातल्या रिकाम्या भिंतीवर ते पोस्टर चिकटवलं आणि हा फोटो काढला. मागे माझा आवडता क्रिकेट पटू आणि कडेवर माझं आवडतं टेडी बेअर .

एवढ्या आठवणी आज या एका फोटो मुळे जाग्या झाल्या. आज द्रविड चा वाढदिवस..एक अद्वितीय क्रिकेटपटू ते under nineteen चा coach आणि आता national coach असा प्रदीर्घ प्रवास त्याने केलाय. केवळ स्वतः खेळत असतानाच नव्हे तर निवृत्तीनंतरही आपल्या मार्गदर्शनाद्वारे उत्तमोत्तम क्रिकेटर्स घडवून देशाला तो कायम योगदान देत आलेला आहे.

या त्याच्या अतुलनीय योगदानाबद्दल पद्मभूषण राहुल द्रविड ला मनाचा मुजरा व वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा.

— गौरी सचिन पावगी

Avatar
About गौरी सचिन पावगी 26 Articles
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

1 Comment on ‘The wall’ on the wall… आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..