हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील माईलस्टोन ठरलेला बहुचर्चित युध्दपट हिमालया फिल्मच्या ‘हकीकत ‘ ( रिलीज २० एप्रिल १९६४) च्या प्रदर्शनास ५७ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९६२ साली चीनविरुध्द झालेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन आनंद यांचे आहे.
हा एक उत्तम आदर्श युध्दपट म्हणून गणला जातो. या चित्रपटात बलराज साहनी ( मेजर रणजित सिंग), धर्मेंद्र ( कॅप्टन बहादूर सिंग), विजय आनंद ( मेजर प्रताप सिंग), तसेच प्रिया राजवंश, संजय खान, सुधीर, शेख मुख्तार इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाची गीते कैफी आझमी यांची असून संगीत मदन मोहन यांचे आहे. या चित्रपटातील जरा सी आहट होती है ( पार्श्वगायिका लता मंगेशकर), अब तुम्हारे हवाले वतन साथियो (मोहम्मद रफी), हो के मजबूर मुझे ( मोहम्मद रफी, भूपेन्द्र सिंग), मै यह सोचकर ( मोहम्मद रफी), आई अबके साल दीवाली ( लता मंगेशकर) ही या चित्रपटातील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. अनेक यशस्वी चित्रपट गाण्यांच्या लोकप्रियतेने सतत पुढील पिढीला माहिती होत राहिले त्यात हा युध्दपट विशेष उल्लेखनीय आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply