
१३ जुलै १९२३ रोजी – कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस शहरात जाताना लागणाऱ्या माउंट हिल्स डोंगरावर ‘HOLLYWOOD’ हा शब्द बसवण्यात आला. पंचेचाळीस फूट उंच आणि साडेतीनशे फूट लांबीच्या या आकारात पांढऱ्या अक्षरात ‘HOLLYWOOD’ लिहिलेले आहे. हे लिहिण्याचा उद्देश येथील जागेच्या किंमती वाढवण्यासाठी होता सुरुवातीला याचा आकार पन्नास फूट उंच आणि तीस फूट रुंद होता, ज्याचा आकार नंतर च्या काळात वाढवण्यात आला. नंतरच्या काही वर्षांत जेव्हा अमेरिकन चित्रपट लॉस एंजेलिसमध्ये पसरला, तेव्हा याची लोकप्रियता देखील वाढली. सुरुवातीला यावर ‘HOLLYWOOD LAND’ असे लिहिले गेले, नंतर १९४९ मध्ये त्यात बदल करण्यात आले आणि त्यातून ‘ लँड’ हा शब्द काढून टाकण्यात आला.
Leave a Reply