जगातील पहिला अंतराळवीर युरी गागारीनचा जन्म ९ मार्च १९३४ रोजी झाला.
युरी अलेक्सेइविच गागारिन हे युरी गागारीन यांचे पूर्ण नाव. रशियन असलेले युरी गागारीन यांनी १२ एप्रिल १९६१ रोजी Vostok 3KA- 3 या अंतराळ यानातून अंतराळात पहिले पाऊल टाकले. युरी गागारीन यांचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. त्यांची उंची कमी म्हणजे ५ फुट २ इंच होती व ते त्या कँप्सुल मधे फिट बसत होते म्हणुन त्यांची निवड झाली.
१२ एप्रिल १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. पुन्हा प्रुथ्वी वर उतरताना सात हजार फुट उंची वरुन ते कँप्सुल च्या बाहेर येऊन पँराशुटच्या साह्याने पृथ्वी वर उतरले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.
रशियातील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्राला ‘ गागारीन रिसर्च अँड टेस्ट कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर ‘ असे नाव देऊन त्यांच्या स्मृती जतन केल्या आहेत.. ब्रम्हांडात माणुस सैर करु शकतो या साठी युरी गागारीन यांचे शौर्य मानवी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवले गेले
२००८ साली त्यांच्या आठवणीत रशियात हॉकी खेळाच्या एका स्पर्धेस ‘गागारीन कप” असे नाव देण्यात आले. या शिवाय लंडन च्या मादाम तुसा मध्ये ही गागारीन चा पुतळा ठेवला गेला. २७ मार्च १९६८ रोजी Chkalovskay Air Base वरून त्यांच्या MIG – 15 UTI या विमानाने उड्डाण घेतले. पण ते थोड्याच वेळात दुर्घटना ग्रस्त झाले. यात युरी गागारीन आणि त्यांच्या सहकाऱ्याचा दुर्देवी अंत झाला!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply