काल मी श्री नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी म्हणून एक मर्द मराठी माणूस सुनील देवधर यांचा उल्लेख करताच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. काहींनी तर भाजपा मध्ये योगी आदित्य नाथ आणि नितीन गडकरी हे सुद्धा पंतप्रधान पदाचे लायक उमेदवार असू शकतात असे मत प्रदर्शन केले. भारताची एक मानसिकता आहे की कुणाचे कौतुक केले तर लगेच अनेकांच्या पोटात दुखते. पण एखाद्या प्रथित यश ,प्रामाणिक आस्थापनेत जशी चांगली माणसे हेरण्याची आणि त्यांच्यावर कंपनीच्या कामाची जबाबदारी देण्याची पद्धत असते तशी पद्धत जर भाजपा मध्ये अवलंबली जात असेल तर त्याचे स्वागतच होणे जरुरीचे आहे..गडकरी ,आदित्य नाथ यांना मी कमी लेखत नाही पण मला देवधर हे अधिक कणखर आणि बुद्धिमान वाटतात .गडकरी उत्तम प्रशासक आहेत हे ही खरे आहे .पण झोकून देऊन काम करण्याची वृत्ती या मध्ये देवधर सरस ठरले आहेत. मराठी माणूस पंत प्रधान असावा हे तर माझे अत्यंत आवडते स्वप्न आहे !!
कुठलाही राजकीय पक्ष कार्यरत होत असताना त्याची ध्येय धोरणे ठरवली जातात आणि ती धोरणे जन कल्याणाचीच असावी असा एक संकेत असतो.जवळ जवळ सर्वच अधिकृत पक्षांची धोरणे अशीच देशाला नवी दिशा देणारी असतात .प्रादेशिक पक्ष सुद्धा आपल्या प्रदेशाच्या ,राज्याच्या ,आपल्या लोकांच्या हिताचा व्यापक दृष्टीकोन ठेवून निर्माण होतात .मग असे पक्ष अपयशी होण्याची कारणे शोधली तर त्याचे कारण एकाच असते ते म्हणजे कार्यकर्त्यांना त्यांच्या पात्रते नुसार काम न देणे.कधी कधी अगदी सुमार बुद्धीच्या कार्यकर्त्याला त्याला न पेलणारी जबाबदारी दिली जाते.कधी कधी गुंड पुंड पक्षात शिरजोर होतात आणि मग पक्ष कमजोर होतो.कितीही धोरण चांगले असले तरी ते धोरण राबवणारी माणसे चांगली असावी लागतात.पक्षाला लढाऊ वृत्तीची पण माणसे लागतात पण ती माणसे प्रशासनात अपयशी ठरतात.Right man at right place हा तर कुठल्याही पक्षाचा मुलभूत नियम असायला पाहिजे .पण तसे होत नाही .नात्या गोत्याची ,आपल्या गोटातील माणसांची वर्णी पक्षात लावली जाते ….आणि तेथूनच पक्षाला ग्रहण लागते .
जो नेता त्याच्या अनुयायांची निवड करताना ” योग्य व्यक्ती योग्य जागी ” अशी निवड करतो तो नेता पक्ष वाढवण्यास यशस्वी होतो.
श्री सुनील देवधर यांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड सुद्धा उत्तम होती हे वेळो वेळी सिद्ध झाले आहे.यास काही किरकोळ अपवाद असू शकतात पण अपवादानी नियम सिद्ध होतो हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे .पण नियमातील अपवादा ची संख्या वाढली तर मात्र गोंधळ होतो.
श्री सुनील देवधर हे उच्च विद्या विभूषित आहेत .त्यांनी ईशान्य भारताची जबाबदारी पेलताना त्या भागाचा पूर्ण राजकीय आणि सामाजिक अभ्यास केला होता.निर्वासित मुलांचा प्रश्न सोडवला .महिलांना निर्भर केले.आदिवासी क्षेत्रात तर एखादा मिशनरी काम करतो तसे काम केले .त्यांना त्या भागातील भाषा शिकाव्या लागल्या .कुशाग्र बुद्धीमत्ता असल्याने त्यांनी नुसत्याच भाषा शिकल्या नाहीत तर भारताच्या ईशान्य भागातील राज्यांचा पूर्ण अभ्यास केला.जीवावर उदार होऊन संघटना बांधली .इतर पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना आपलेसे केले.ज्या ठिकाणी औषधाला भाजपा नव्हती त्या ठिकाणी भाजपा वाढवली आणि सत्तेवर आणली .राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीच्या चौकटीत काम केले .शिवरायांची युद्ध नीती पुरेपूर वापरली आणि नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला तो सार्थकी ठरवला .त्रिपुरात देवधर एकाकी होते. तेव्हा मोठा विजय ‘त्रिपुरा’चा आहे.हा माणूस अत्यंत लो प्रोफाईल आह,भारताचे उज्वल भवितव्य अशी माणसे घडवू शकतील या वर माझा ठाम विश्वास आहे .
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply