नवीन लेखन...

थर्मास फ्लास्क

आपल्या गरजाही विचित्र असतात. आपल्याला थंडीत गरम अन्नपदार्थ किंवा पेय हवे असतात तर उन्हाळ्यात थंड काहीतरी लागते. असे करावे लागण्याचे कारण आपण उष्ण रक्ताचे प्राणी आहोत. शरीराचे तपमान ३७ अंश सेल्सियस म्हणजे ९८.६ अंश फॅरनहीट राखण्यासाठी हे बदल करावे लागतात.

थर्मास फ्लास्क म्हणजेच व्हॅक्यूम फ्लास्कचा उपयोग आपल्याला कुठल्याही द्रवाचे तपमान आहे ते राखले जाते. थंड पेय त्यात ठेवले तर थंड राहते गरम ठेवले तर गरम राहते.

थर्मास फ्लास्कचा शोध १८९० मध्ये स्कॉटिश वैज्ञानिक सर जेम्स डेवर यांनी लावला.

उष्णता कशी प्रवास करते याचे तीन मार्ग आपल्याला माहीत आहेत ते म्हणजे कंडक्शन, कन्व्हेक्शन व रॅडिएशन. जेव्हा आपण तापलेल्या वस्तूला स्पर्श करतो तेव्हा उष्णता थेट आपल्या शरीरात येते. आपण गरम चहा तयार करतो पण तो काही वेळातच थंड का होतो याचा विचार करायला हवा . एकतर उकळत्या पाण्याचे तपमान हे १०० अंश सेल्सियस असते आपल्या खोलीतील सर्वसाधारण तपमान हे १५- २० अंश सेल्सियस असते. जेव्हा आपण उकळलेला चहा असलेले भांडे थंड पृष्ठभागावर टेकवतो तेव्हा कंडक्शनमुळे त्यातील उष्णता त्या पृष्ठभागाकडे जाते, चहाच्या गरम भांड्यातील उष्णता आसपासच्या हवेकडूनही घेतली जाते, त्याला कन्व्हेक्शन असे म्हणता येईल तर काही उष्णता ही प्रारणांच्या रूपाने जाते त्याला रॅडिएशन म्हणतात. त्यामुळे या तीन कारणांमुळे गरम चहा लगेच थंड होत जातो.

व्हॅक्यूम फ्लास्क हे इन्सुलेशन असलेले भांडे असते. त्यात उष्णता बाहेर पडणार नाही अशा घटकाचा वापर केला जातो. बहुतेक फ्लास्कमध्ये आतले भांडे व बाहेरचे भांडे असे दोन थर असतात. वरचे भांडे हे प्लास्टिक किंवा धातूचे असते. दोन भांड्यांच्या मधल्या भागात पोकळी असते पण ती पोकळी काचेच्या दोन थरांमध्ये निर्माण केलेली असते. अनब्रेकेबल फ्लास्कमध्ये काच वापरली जात नाही. त्यात स्टेनलेस स्टीलचे दोन थर वापरतात त्यांच्यामध्ये निर्वात पोकळी असते. वरच्या बाजूने स्क्रूप्रमाणे फिरवता येईल व घट्ट बसेल असे झाकण असते. त्यामुळे उष्णता बाहेर पडू शकत नाही. फ्लास्कचा वापर केवळ गरम पदार्थ गरम राखण्यासाठी होतो असे नाही तर थंड पेये थंड ठेवण्यासाठीही त्यांचा वापर करता येतो. जर एखाद्या फ्लास्कमधून उष्णता बाहेर जात नसेल तर ती आतही येऊ शकत नाही. असे असले तरी स्टॉपरमधून काही उष्णता बाहेर जाते. थर्मास फ्लास्कमध्ये स्क्रू स्टॉपर, बाहेरचे प्लास्टिक किंवा स्टेनलेसचे आवरण, बाहेरचा परावर्तक घटकाचा थर असलेला काचयुक्त थर, निर्वात पोकळी, आतील काचेचा किंवा स्टेनलेसचा थर, अतिरिक्त उष्णतारोधक आवरण असे भाग असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..