नवीन लेखन...

भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन

जन्म: ८ फेब्रुवारी १८९७
मृत्यू: ३ मे १९६९

डॉ. झाकीर हुसेन अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरूही होते. १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. १९६७ मध्ये ते भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले.

कार्यकाळ: १३ मे १९६ ते  ३ मे १९६९


भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन हे एक ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म अफगाण मुसलमान कुटुंबात हैदराबाद (सिंध) येथे झाला. त्यांचे वडील वकील होते.
झाकीर हुसेन यांनी इटावा, अलीगढ आणि बर्लिन या ठिकाणी शिक्षण घेतले. त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली, अर्थात पीएच.डी. प्राप्त करण्याआधीपासूनच ते १९२० मध्ये जामिआ मिल्लिया इस्लामिया या शिक्षण संस्थेकडे आकर्षित झाले होते. जर्मनीहून भारतात परत येताच, त्यांनी आपले सर्व जीवन या संस्थेस समर्पित केले. १९२५ मध्ये सदर संस्था दिल्लीस हलविण्यात आली आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी १९२६ साली झाकीर हुसेन या संस्थेचे कुलगुरू झाले. त्यांनी जवळजवळ २२ वर्षे या संस्थेत कार्य करीत तिला एका अभिनव शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. महात्मा गांधी व जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ केर्शेनस्टाइनर या दोन विभूती झाकीर हुसेन यांच्या शैक्षणिक वाटचालीतील स्फूर्तिस्थाने होती. अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांनी काम केले. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी.लिट. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. १९५४ साली पदमविभषण आणि १९६३ साली सर्वोच्च असा ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन भारत सरकारने झाकीर हुसेन यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला, महात्मा गांधींचे ते प्रथमपासून निष्ठावान अनुयायी होते. महात्माजींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे अध्यक्ष केले. त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र वगैरे विषयांचे आपले विचार व्याख्यानांद्वारे मांडले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..