नवीन लेखन...

यालाच म्हणतात भविष्याचा वेध

This is Called Forecasting the Future

इस्त्रायलची जगण्याची लढाई…….

नाही तर हा ज्यू/यहुदी समाज कधीच इतिहास जमा झाला असता….जसा हिन्दूचा ह्रास होत आहे

एक वेळ जगात 32 देशात हिन्दू राज्य होते व धर्म लोकसंख्या जगात सर्वात जास्त होती आज काय व कुठे आहे………..

फ्रान्स वर लागोपाठ हल्ले झाले,पण फ्रान्स वर गन आणि ट्रकनेच हल्ला होतोय अणुबॉंबने नाही याबद्दल त्यांनी इजरायलचे आभार मानले पाहिजेत.

फ्रान्स आणि इजरायलची मैत्री तशी जुनीच, इजरायल विरुद्ध अकरा अरब राष्ट्रांचे सहा दिवस युद्ध चालले तोपर्यंत ती मैत्री अबाधित होती , परंतु अरब राष्ट्रांविरुद्ध वापरणार नाही अशी हमी देऊन फ्रान्स कडुन विकत घेतलेली शस्त्रास्र इजरायलने त्या युद्धात सढळ हाताने वापरली आणि या मैत्रीला ग्रहण लागलं कारण तेलसंपन्न अरबांना दुखावणं फ्रान्सला शक्य न्हवते. फ्रान्सने इजरायल बरोबर मिराज-3 विमानं आणि मिसाईल बोटी देण्याचा करार संपुष्टात आणला. इजरायल भडकला, यहुद्यांनी मिराज 3 ची blue print आणि फ्रेंच बंदरात असलेल्या मिसाईल बोटी पळवुन नेल्या आणि आपले इप्सित साध्य केले. फ्रान्सचा तिळपापड झाला आणि त्यांनी यहुद्यांना धडा शिकवायचे ठरवले.

1971 च्या काळात पेट्रोलियमचे दर भडकलेले होते , त्याकाळात फ्रान्स अणु आणि पेट्रोलियम वर उर्जेसाठी अवलंबून होता , फ्रेंच शिष्टमंडळ तेलासंदर्भात बोलणी करण्यासाठी तेलसंपन्न इराक मध्ये पोहचले, सद्दाम तेव्हा सत्तेत न्हवता परंतु त्याचा राजकीय दबदबा मात्र होता. इराकने स्वस्त तेलपुरवठ्याच्या देण्याच्या बदल्यात अणुभट्टी इराकला द्यावी असा प्रस्ताव ठेवला. फ्रान्सला तर हर्षोल्लास झाला कारण स्वस्त तेल आणि शिवाय इजरायलच्या नाकावर टिच्चुन इराकला अणुभट्टी द्यायची असा दुहेरी फायदा.

फ्रान्सने अमेरिका , ब्रिटन , रशियाचा विरोध धुडकावून लावला आणि 70 megawatt क्षमतेची अणुभट्टी आणि 12 kilogram युरेनियमचा पुरवठा इराकला देण्याचा करार केला. एवढ्या युरेनियमपासुन तिन चार अणुबॉंब बनतात. इजरायलने आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद मागितली परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अण्वस्त्रधारी इराक इजरायलचे अस्तित्व संपुष्टात आणु शकतो हे इजरायलला माहिती होत त्यामुळे त्यांनी स्वतःच मार्ग काढण्याचे ठरवले.

इजरायलने आपले हेरांचे जाळे फ्रान्स मध्ये पसरवले. स्नीम नावाच्या कंपनीला अणुभट्टीचे कंत्राट मिळाले आहे आणि अणुभट्टी व सुट्या भागांची बांधणी पुर्ण झाल्याचे हेरांनी कळवले. अणुभट्टी प्रकल्पात अत्यंत मोजक्या लोकांना याबद्दल पुर्ण माहिती असते परंतु कर्मचार्यांच्या हालचाली , पत्रव्यवहार, टेलिफोन संभाषण यावर नजर ठेवून तुकड्यातुकड्यांनी त्यांनी सर्व माहिती गोळा केली.तुलोन बंदरातील गोदामात सदर अणुभट्टी असल्याचे मोसादला कळाल्यावर 1979 च्या एप्रिल मध्ये पॅरीस वरुन तिन मोसादचे गुप्तहेर तुलोन येथे आले तिथे त्यांना अजुन चार स्फोटकतज्ञ येऊन मिळाले. अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या गोदामातुन अणुभट्टीचे जमतील तेवढे भाग पळवायचे आणि बाकीचे नष्ट करून टाकायचे असा सर्वसाधारण plan होता.

भिंती ओलांडुन गुप्तहेरांनी अलार्म बंद पाडले, पहारेकऱ्यांना थंड केले , योग्य त्या ठिकाणी स्फोटकं लावुन ते तिथून रफुचक्कर झाले ते पुन्हा फ्रान्स मध्ये न दिसण्यासाठी. पहाटेच्या वेळी फ्रान्स बॉंम्बस्फोटांनी हादरून गेलं आणि इराकच स्वप्न काही काळ पुढे ढकलंल गेलं. 1980 मध्ये मोसादने दुसरा धक्का दिला. फ्रेंच सरकारच्या निमंत्रणावरून गेलेल्या इराकी अणुशास्त्रज्ञ अल-मेशाद यांची हत्या पॅरीस मध्ये करण्यात आली. फ्रान्सने हि बातमी लपवली परंतु इजरायलने जगासमोर आणुन आपणच त्यामागे असल्याचे दाखवुन दिले. आता मात्र फ्रान्स भडकला आणि युद्धपातळीवर अणुभट्टी बांधुन इराकला कडेकोट बंदोबस्तात पोहचवुनच शांत बसला.
सदर घटनेमुळे इजरायली पंतप्रधान शांती , बंधुता, समजुतदारपणा वगैरे पोकळ गप्पा मारत बसले नाहीत त्यांनी योग्य ती पाऊले उचलण्याचे आदेश दिले. इजरायलला आता शेजारी कट्टर दुश्मन असलेल्या सिरीया , जॉर्डन, सौदीअरेबीयाच्या पलीकडे असलेल्या इराक वर हल्ला करायचा होता. इजरायल मधुन सरळ रेषेत इराक ला पोहचायचे तर साधारणपणे लाखभर चौरस किलोमीटरचा जॉर्डन पार करावा लागत होता परंतु त्यात शेजारी देश इराकला सावध करण्याचा धोका होता त्यामुळे जॉर्डनला वळसा घालून इराकला जाणे सोयीस्कर होते परंतु एकुण अंतर होत होते 2200 kilometer आणि इजरायल कडे तेंव्हा असणारी फॅंटम विमानं तितक्या क्षमतेची न्हवती त्यामुळे हे एकप्रकारे आत्मघातकीच मिशन होते.

सराव सुरु झाला , तिकडे इराण इराक युद्ध सुरु झाले यातच एक दिड वर्ष गेली आणि तोवर अत्याधुनिक अमेरिकन F16 विमानं इजरायल कडे दाखल झाली. इजरायली तज्ञांनी अणुभट्टीचे कवच फोडण्यासाठी एक टन वजनाचा बॉंम्ब 45 अंशाच्या कोनात आपटायला हवा तर दुसरा बॉंम्ब त्या भगदाडातुन आत टाकुन अणुभट्टीची यंत्रणा नष्ट करण्यासाठी टाकावा असा निष्कर्ष काढला त्यानुसार सराव सुरू झाला.

सहा F16 विमानं यासाठी तयार करण्यात आली . यामध्ये काही तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या पण ते सगळं सविस्तर लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही. 7 june 1981 ला इजरायली विमानांनी हल्यासाठी मार्गक्रमण सुरू केले , सौदीअरेबीया मागे टाकुन विमानं इराक हद्दीत कमी उंचीवरून वेडीवाकडी उडत ओसिराक मध्ये शिरली. त्यांना आता समोरच अणुभट्टीचा घुमट दिसु लागला. प्रतिक्षा संपलेली होती . विमानांनी आठ हजार फुटांची उंची घेतली मग सुर मारत घुमटावर निशाणा धरुन एक टनाचा पहिला बॉंम्ब मुक्त झाला मग दुसरा मग तिसरा आणि एकुण बारा बॉंम्ब टाकुन F16 आपलं कर्तव्य बजावुन इजरायलच्या दिशेनं उडु लागली.

अण्वस्त्रधारी होण्याचं इराकच स्वप्न धुळीला मिळाले परंतु आज त्या घटनेचं आणि धाडसाचं महत्व मला वाटत. माथेफिरू लोकांच्या हाती अण्वस्त्रासारखी शस्त्र असणे हि कल्पनाच भयंकर आहे.

मोसादने अशीच योजना भारताच्या साथीने पाकिस्तानी अणुप्रकल्पाबाबत आखली होती परंतु नेभळट आणि कचखाऊ भारतीय मनोवृत्ती मुळे आपल्या देशावर कायम टांगती तलवार आहे. आता काश्मीर असो किंवा मुंबई हल्ला असो सगळे प्रश्न टेबलावर आणि proxy war नेच सोडवायचे कारण आपला शेजारी नंगा आहे आणि नंगेसे खुदा भी डरता है.

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..