रोज रोज तेचं तेचं
लाडू नकोत गोडाला
कधीतरी चवीसाठी
ठेचा हवाच ठसक्याला
तसेच आहे आयुष्यात
लावून घेऊ नये मनाला
थोडे तुझे थोडे माझे
घेऊन लागू प्रवासाला
थोडे दिवस शांत शांत
घरात राहिलं अबोला
चांगलेच असते वादापेक्षा
काहीच आपण न बोला
वेळ जातो तसे वाटते
उगीच बोललो जीवाला
जाऊदेत सोडून देऊ
सारे काही वेळेला
आपण सारे विसरतोही
विषय सोडे मागला
आप्त मित्र आठवण करी
घे आता बदला चांगला
तरी एक कानमंत्र
ठेऊ एक गाठीला
बाहेर कुणा सांगू नाही
नाहीतर घेतील चर्चेला
हसून खेळून घेऊ सारे
सोडून देऊ विषयाला
जुळतात बंध हळूहळू
लागेल गोडी संसाराला!!
— वर्षा कदम.
Leave a Reply