नवीन लेखन...

‘ती’ अजूनही आहे …. !!

मित्राच्या घरचे आमंत्रण होते …

पावसाचे दिवस असल्याने जरा लवकरच निघालो होतो पण काहीही अडथळा न आल्याने तब्बल पाऊणतास लवकर पोहोचलो, मित्र आणि त्याच्या घरचे इतर अजून पोहोचायचे असल्याने त्याचे घर बंद होते. परिसरातच Time Pass करायचे ठरविले… आणि बसायला जागा शोधायला लागलो. फारसा त्रास न होता छानशी जागा मिळाली टॅब काढून whattsup सुरु करणार तेव्हड्यात माझे लक्ष गेले ….

बऱ्याच दिवसानंतर एक लहान बाळ दोन वर्षे किंवा कमी वयाचे छान दुडू दुडू धावत असलेले पाहण्यात आले … …

…. म्हणजे बद बद धावत नव्हते …

कारण त्याच्या ढुंगणाला “शी” आणि “सु” जमा करायची टोपली बांधलेली नव्हती …..

त्याला अगदी नैसर्गीकपणे धावतांना पाहिले आणि माझे कुतूहल जागे झाले त्याची आई बाजूला कुठे दिसते का ते पाहू लागलो आणि लक्षात यायला वेळ लागला नाही .. एक साधारणपणे तिशीतील तरुणी त्या बाळाकडे लक्ष ठेऊन होती …

तेव्हड्यात ते बाळ खाली बसले …. तेही नैसर्गीकपणे ….

आजकाल बाळं जेंव्हा ढुंगणाशी बांधलेल्या टोपली सकट जेंव्हा बसतात तेंव्हा त्या बिचाऱ्यांना नीट बसताही येत नाही …

त्या आईला मी मुलाच्या नैसर्गिक धावण्याबद्दल आणि बसण्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स दिल्या …

माझ्या मित्राचा फोन येईपर्यंत आमच्यात थोडाफार संवाद झाला त्यावरून जे काही कळले ते असे …

ते आई – वडील software कंपनी मध्ये काम करणारे …

पाच वर्षांपूर्वी लग्न झालेली ….

मूल वाढविण्याचा निर्णय करतांनाच आईने नोकरी सोडण्याचा निर्णय दोघांनी मिळून घेतलेला …

मूल मोठे होईपर्यंत आई नोकरी करणार नाही ….

मुलाला नीट वाढविण्यासाठी दोघेही प्रयत्नशील असतात ….

प्रत्येक बाब नीट विचार करून ठरवितात …

आणि घराच्या सर्वांना त्यांचा हा निर्णय मान्य असून त्या सर्वांचे संपूर्ण सहकार्य आहे…

तर ….

खऱ्या “आई” म्हणून शोभणाऱ्या तरुणी आणि “वडील” म्हणून शोभणारे तरुण कमी झाले असले तरी … अजूनही आहेत …..

— मिलिंद कोतवाल
Milind Kotwal 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..