ती आणि तो स्टेशनवर दिसले
कॉलेजमधले असतील…
काहीतरी बिनसले होते….
ती त्याच्या गळ्याला हात
लावून शपथ घेत सांगत होती
आणि ती पण तसेच करतहोती…
दोघेही साधे …लोक बघत होते
त्यांना कळत होते तरीपण
ते दुर्लक्ष करत होते..
शपथा….सागणे..आर्जव करणे..
हे असेच चालते प्रेमात..
शेवटी त्याची गाडी आली..
तो थोडे ‘ किस ‘ सारखे करून गेला..
ती तशीच परत…
पुढे चालू लागली…
तोच तिचा मोबाईल सुरु झाला
परत तेच सुरु….
प्रेमात असेच असते…
त्यांना थांबणे माहीत नसते…..
— सतीश चाफेकर.
Leave a Reply