ती कुंकू लावते मंगळसूत्र घालते
मग तिला नावं ठेवली जातात
पण या नावं ठेवणाऱ्या काही बायका
फॅशन म्हणून वेगवेगळी मंगळसूत्र घालतात
तिने हळदी कुंकू केलं म्हणून
मागासपणा काहीजणी म्हणतात
पण किटी पार्टी असते खरी यांची ती
पण नावाला या हळदी कुंकू आहे म्हणतात
संस्कार संस्कृती जपली तर बॅकवर्ड ठरतो
हाय फायच्या नावाखाली सरळ
सण परंपरा नाकारणं होत असत
हल्ली आता नवीनच फॅशन आली
पुरुषांना उगाच बोलायचं
स्त्री मुक्तीच्या नावाखाली नाहक
सरसकट प्रत्येक पुरुषाला चुकीच ठरवायचं
खरच सांगा बायांनो अस खरं असतं?
कुठलाच नवरा किंवा पुरुष प्रत्येक
जड जोखड बायकांवर लादत असतो?
नसत अस खर काही पण दाखवलं जातं
काही टक्के असतील पुरुष तसे
पण बायकांचं बोलणं मात्र होत असत
स्त्री पण दुसऱ्या स्त्रीला बोलते
सोडत नाही बाई बाईलाच बोलणं
पुरुष राहिले बाजूला सारे मग
बाईला बोलणं पण कुठे अजूनही सुटलं
सण संस्कृती ही आपली परंपरा
त्यात बायकांना वेठीस धरण होत नसत
करा किंवा करु नका प्रत्येकीच मत
पण पुरुषांना बोलणं चुकीच होत असत
सणात भारी साडी दागिने बायकांना नटायला
कारण मग हळदी कुंकूच चालते
तेव्हा सहज हौसेने होत असते पण
दुसरीने हे सण जपले तर मागासपण ठरते
हल्ली म्हणे टिकली लावली तर ती
ओल्ड फॅशन होते टिकली ही फॅशन
हे गणित नव्यानेच आता कळते
खर सांगू प्रत्येक स्त्री टिकली लावल्यावर
सुरेख छान दिसते चेहेऱ्यावरील
भाव टिकली रेखते
मंगळसूत्र घाला अथवा नका घालू
हा प्रत्येकीचा निर्णय असतो पण
त्या वरुन पण इशू करणं कित्येक
बायकांना सहज अस जमत असत
थोडक्यात सार सांगते कित्येक स्त्रिया
त्यांच्या सवडीने वागत असतात
बोलतांना मात्र त्या स्त्री समानतेवर
उगाच नारे लावून बोलत असतात
नवीन फॅशन म्हणून जुन्याला
नावं ठेवण बऱ्याचदा होत असत
पण हौस करायची तर जुन्याच
गाठोडं काहीजणींना चालत असत
सत्य आहे हे सखींनो राग मानू नका
पुरुषाला बोलतांना विचार करुन पहा
स्वतंत्र आहे स्त्री तरीही नारे लागतात
काळाच्या नावाखाली चुकीचे नारे लागतात
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply