ती तशी शाळेतली
तो ही तसाच
ती दोघे नेहमी
बोलताना दिसतात
संपूर्ण नवखेपण
जाणवत होते
त्यांच्या बोलण्यावरून…
एक दिवशी त्याचा हात
तिच्या
हातात आला..
आणि मग सुरवात झाली..
नवखेपण जाण्याची ती
खुण होती……
त्यानंतर..त्यांनतर
बरेच काही घडणार होते…
प्रेमाच्या बाराखडीला
सुरवात तर झाली….
पुढे काय झाले….
तुम्ही विचारणार ना ,
उत्तर तुमच्याकडेच आहे
तुमच्या स्वभावात ?
— सतीश चाफेकर.
Leave a Reply