ती आत्महत्त्या करताच समाज तिच्याच
चारित्र्यावर प्रश्न चिन्ह लावून मोकळा होत असतो…
पण तिने आत्महत्त्या करण्यापूर्वी
किती रात्री जागून काढल्या असतील,
किती उश्या तिच्या अश्रुंनी ओल्या झाल्या असतील,
कित्येकदा मनातल्या मनात ती मेलीही असेल
याचा विचार कोणी कधीच करीत नाही…
प्रत्येकाला तिच्या मृत्यूचे कारण जाणण्यात रस असतो…
ती गेल्याचे दु:ख फारच थोड्यांना असतं …
बाकीच्यांना तो मनस्तापच वाटत असतो…
कोण म्हणतं तिचं प्रेमप्रकरण असेल,
कोण म्हणतं तिचा प्रेमभंग झाला असेल,
कोण म्हणतं ती गरोदर असेल,
कोण म्हणतं तिचे लग्न ठरत नव्हतं,
कोण म्हणतं तिच मन फारच हळवं होतं…
पण खरंच हिच कारणे असतात का तिच्या आत्महत्तेमागे ..?
तिच्या आत्महत्तेची खरी कारणे कधीच येत नाहीत का जगासमोर…
पुरुषांना जन्माला घालणारी स्त्री
त्याच पुरुषांच्या अहंकाराची बळी ठरत असते का ?
ठरत असेल तर हे वेळीच थांबायला हवे !
तिची आत्महत्त्या टाळायला हवी !
नाहीतर… तिच्या अभावी…
भविष्यात कित्येक पुरुषच
आत्महत्त्या करताना दिसतील…
©कवी – निलेश बामणे ( एन.डी.) 18-02-24
Leave a Reply