तिच्याबद्दल त्याला
आकर्षण खरे तर आधी
नव्हते…पण काळानुरूप
ते निर्माण झाले…
अर्थात हे तुमच्या-आमच्या
बाबतीत घडू शकते
तसे त्याच्या बाबतीत घडले
तिच्या बाबतीतही तसेच झाले….
लहानपणी अनाहूतपणे
बांधलेल्या राख्या आठवल्या
वास्तविक पहाता ते दोघे
सख्खे शेजारी….
पण त्यांचे प्रेम जमले
लहानपणीचा मूर्खपणा
त्यांना जेव्हा आठवतो तेव्हा
ते दोघे गंभीर होतात
पण एकवेळ अशी येते
त्या मूर्खपणाचे हसू ही येते…
आणि मग प्रवास परत
शांतपणे सुरु होतो…
— सतीश चाफेकर.
Leave a Reply