क्रोनॉन – एका सेकंदाचे 10 घातांक 43 म्हणजे 1043 केले तर त्या एका भागास 1 क्रोनॉन असे म्हणतात. पुंजवादानुसार 1 क्रोनॉन हा काळाचा एक पुंज (क्वांटम) आहे. त्यास प्लँककाळ असेही म्हणतात. काळाच्या यापेक्षा लहान भागाला अस्तित्व नाही. 1 या आकड्यावर 43 शून्ये लिहीली असता जी संख्या होते तितके क्रोनॉन म्हणजे 1 सेकंद. जितक्या अल्पकाळात घडणारी कोणतीही व्यवहार्य घटना आढळत नाही.
ॲट्टो सेकंद – 1 सेकंदाच्या अब्जाच्या भागाचे आणखी 1 अब्ज भाग केले तर त्या एका भागास 1 ॲट्टोसेकंद म्हणतात. अत्याधुनिक अतिवेगवान लेझरमुळे प्रकाशाचे अतिसूक्ष्म पुंज निर्माण केले आहेत. मशीनगनमधून गोळ्या सुटाव्या तशा प्रकाशपुंजाच्या गोळ्या या लेझरमधून सुटतात. 1 प्रकाश गोळी सुटल्यानंतर दुसरी प्रकाशगोळी 250 ॲट्टोसेकंदानंतर सुटते. 10 परार्ध (1018) ॲट्टोसेकंद म्हणजे 1 सेकंद.
एका सेकंदाच्या अब्जाव्या भागाच्या 10 लाखावा भाग म्हणजे फेन्टोसेकंद.
फेन्टोसेकंद – 10 लाख ॲट्टोसेकंद म्हणजे 1 फेन्टोसेकंद. रेणूमधील प्रत्येक अणू कंप पावत प्र असतो. त्याचे एक कंपन सुमारे 10 ते 100 फेन्टोसेकंदात पूर्ण होते. अतिशय वेगवान रासायनिक क्रियांना देखील शेकडो फेन्टोसेकंदाचा काळ लागतो. डोळ्यातील दृष्टीपटलावरील रंगद्रव्यावर प्रकाशाची क्रिया न होण्यास 200 फेन्टोसेकंदाचा काळ लागतो. ´आणि ही क्रिया होऊन निर्माण झालेला संदेश क दृष्टीमज्जेद्वारा मेंदूतील दृष्टीकेंद्रात पोचून तेथेही 5 प्रक्रिया होते आणि आपल्याला समोरच्या दृष्याची. त्याच्या रंगाची, त्यातील वस्तूंची प्रत जाणीव होते. सजीवांच्या डोळ्यांना दिलेली ही निसर्गाची देणगी म्हणजे अत्यंत गूढ आणि अनाकलनीय बाब आहे. 1 अंत्य (1018) फेन्टोसेकंद म्हणजे 1 सेकंद.
पिकोसेकंद – अतिवेगवान ट्रान्झिस्टर हा पिकोसेकंदाच्या मर्यादेत कार्य करतो. अणुगर्भीय कणांना ऊर्जा देणाऱ्या अतीशक्तीशाली यंत्रामुळे निर्माण झालेल्या क्वार्क या अणुगर्भीय कणाची आयुमर्यादा पिकोसेकंदाची असते. पाण्याच्या रेणूमधील हायड्रोजन अणूंमधील बंधसारखे घडत आणि तुटत असतात. सामान्य तापमानावर हे हायड्रोजन बंध जास्तीत जास्त 3 पिकोसेकंदापर्यंत स्थिर राहू शकतात. 1 महापद्म (1012) पिकोसेकंद म्हणजे 1 सेकंद.
नॅनोसेकंद – निर्वात प्रदेशातून प्रकाशकिरण 1 नॅनोसेकंदात फक्त 30 सें.मी. प्रवास करतो. संगणकाचा मायक्रोप्रोसेसर दिलेली 1 आज्ञा पाळून त्यानुसार कृती करण्यासाठी 2 ते 4 नॅनोसेकंदाचा कालावधी लागतो. म्हणजे दोन आकड्यांची बेरीज किंवा वजाबाकी करण्यास एवढा अवधी लागतो. के मेसॉत या अणुगर्भीय कणाचे आयुर्मान 12 नॅनोसेकंदाचे असते.
1 अब्ज (109) नॅनोसेकंद म्हणजे 1 सेकंद मायक्रोसेकंद – या अवधीत प्रकाशकिरण फक्त 300 मीटर प्रवास करतो आणि त समुद्रसपाटीवर आवाजाच्या लहरी फक्त 033 मिलीमीटर एवढेच अंतर पार करतात. अतीवेगवान स्ट्रेबोस्कोपमधून निघालेला प्रकाशपुंज 1 मायक्रोसेकंदच टिकतो. बत्ती लावल्यापासून 24 मायक्रोसेकंदात डायनामाअटिचा स्फोट होतो.
मिलिसेकंद – सध्या उपलब्ध असलेले कॅमेरे मिलिसेकंदापेक्षा कमी वेळ एक्पोअर देऊ शकत नाहीत. आपल्या घरातली माशीला किंवा डासाला आपल्या पंख एकदा खालीवर करण्यासाठी 1 मिलिसेकंद लागतात. मधमशीला 5 मिलिसेकंद चंद्राची पृथीभोवती कक्षा वाढत असल्यामुळे त्याला पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी fa प्रतीवर्षी 2 मिलिसेकंद जास्त काळ लागतो. संगणकीय भाषेत 10 मिलिसेकंदाची कालांतरास ‘जिफी’ असे म्हणतात.
1 हजार मिलिसेकंद म्हणजे 1 सेकंद एक दशांश सेकंद – मानवी डोळ्याच्या पापणीची उघडझाप होण्यासाठीचा काळ. आवाज आणि त्याचा प्रतिध्वनी यास कमीतकमी दशांश सेकंदाचे अंतर असेल तर ते आपल्या कानांना ते अलगअलग ओळखता येतात. व्हायेजर 1 हे अवकाशयान सूर्यमालेबाहेर प्रवास करीत आहे ते एवढ्या काळात दोन कि.मी. दूर जाते आहे. हर्मिंगबर्ड आपल्या पंख 7 वेळा खालीवर करतो 1 सेकंद – निरोगी व्यक्तीच्या हृदयाचा एक ठोका पडण्यास म्हणजे हृदयाचे एक स्पंदन होण्यास लागणारा काळ. एवढ्या वेळात अख्ख्या अमेरिकेत पिझाच फ 350 त्रिकोणी तुकडे खाऊन फस्त होतात. पृथ्वी सूर्याभोवती 30 कि.मी. चा प्रवास करते आणि सूर्य आकाशगंगेच्या मध्याभोवती 274 कि.मी.चा प्रवास करतो. चंद्राचा प्रकाश 1.3 सेकंदात पृथ्वीवर पोचतो. म्हणजे आपण जेव्हा चंद्राकडे पाहतो त्यावेळी तो 1.3 सेकंदापूर्वीचा असतो. 1 प्रमाण सेकंद म्हणजे सीलीयम 133 च्या अचूला 9192631770 म्हणजे 9 अब्ज १९ कोटी 26 लाख 31 हजार सातशे आवर्तनांना लागणारा काळ. हीच आधुनिक सेकंदाची प्रचलीत व्याख्या आहे.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply