अभिमान अम्हा देशाचा
विश्वास असे ज्ञानाचा,
तो क्षणही दूरवर नाही
नव उदय महासत्तेचा
आव्हान संकटे आली
ना मानली कधिही हार,
त्वेषात पेटुनी लढलो
उघडले कीर्तीचे दार
संघर्ष जरीही केला
पण हात पसरले नाही,
अडखळलो पडलो उठलो
परि इमान विकले नाही
बुद्धीच्या जोरावरती
श्रम जिद्द आणि शांतीने,
उत्तुंग भरारी घेता
यश आले आनंदाने
त्यागाची लावुनी ज्योत
आत्मनिर्भर भारत बनवू,
करोनि स्वदेशी जागर
हा महान भारत घडवू
ही हिंद संस्कृती मोठी
संदेश विश्वशांतीचा,
अन् फडकत अविरत ठेवू
तिरंगा स्वाभिमानाचा
– विजय जोशी
Leave a Reply