नवीन लेखन...

तीर्थ निर्माल्य औषध

मी गेले वीस वर्षे पुण्यात व पुण्याजवळ मिळणार्‍या 190 फुलांच्या औषधी उपयोगावर माझ्या पध्दतीने संशोधन केले व करत आहे. ह्या संशोधनातून मला असे लक्षात आले की खास देवाना वाहण्याची जी फुले आहेत ती सर्व  सामान्य व पिरीआॅडिकली येणार्या आजारांवर उपयोगी आहेत. त्याची माहिती पुढे देत आहे.

झेंडू–कफयुक्त खोकल्यावर उत्तम. सर्दी पडसे, डोळ्याचा नंबर वाढणे,मोती बिंदू, काच बिंदू वर उपयोगी.

गुलछडी–बध्दकोष्टता, कोलायटीस, कोरडा खोकला, अंगाला सूज, पायाला सूज, किडनी फेल, क्रिएटेनिन वाढणे, ब्लड यूरिया वाढणे इत्यादी वर उपयोगी.

शेवंती— अॅसिडीटी, पोटातील जळजळ, संडासला खडा होणे, लघवीला आग होणे, कोरडा खोकला, लिव्हरला सूज इत्यादीवर उपयोगी.

बिजली–पाळीला पोटात दुखणे, प्रोस्टेट वाढणे, पित्त वाढणे इत्यादीवर उपयोगी.

जास्वंद–कंपवात, मॅनेंन्जायटीस,लिव्हरला सूज, बध्दकोष्टता,कोलायटीस इत्यादीवर उपयोगी.

पारिजातक–तोंड येणे, सर्दीपडसे, डोळ्याचा नंबर वाढणे, डोळे लाल होणे, पाळीला पोटात दुखणे, मोनोपाॅजचा त्रास, अंगावर काळे डाग, इसब,चट्टे गाठी उठणे, संडासला साफ न होणे, इत्यादीवर उपयोगी.

गलांडी— घशासाठी उत्तम.

सोनचाफा–पाळी लांबणे, पाळीला गठ्ठे पडणे, गुडघे दुखी, आमवात, हाडाचा क्षय, स्वरयंत्र, थायराॅईड, लघवीली आग होणे इत्यादीवर उपयोगी.

दुर्वा— गर्भाशय, ओव्हरीज, प्रोस्टेट याच्या उष्णतेवर काम करतात, टाच दूखीवर उपयोगी.

बेल—  बेलामुळे  शरीरातील हीट कमी होते हा मूळव्याध, बी पी, मधुमेहा साठी उपयोगी आहे.

फुलाचा औषधी उपयोग करण्यासाठी फुल पाण्यात काही तास भिजवून ते पाणी प्यावे लागते.

देवावर फुले वाहतो ती दूसरे दिवशी तशीच असतात. तो पर्यंत त्यातील औषधी अंश काही प्रमाणात देवाचे मुर्तीला चिकटतो व पूजा करताना तो अंश पाण्यात उतरतो आणि ते पाणी तीर्थ म्हणून वापरले जाते. त्यात औषधी गुणधर्म असल्यामुळे पूर्वजानी त्याला पवित्र ठरवून हे तीर्थ पिण्याची प्रथा पाडली व  समाजाचे आरोग्य सहज राखण्याचा प्रयत्न केला.

आम्ही आधुनिक शिक्षणामुळे तीर्थ पीत नाही टाकाऊ, अस्वच्छ ठरवतो. आणि स्वत:चाच तोटा करून घेतो.

— अरविंद जोशी, पुणे
BSc

Avatar
About अरविंद जोशी 41 Articles
अरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.

1 Comment on तीर्थ निर्माल्य औषध

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..