तो पुन्हा आलाय
पण तो गडबडलाय
आणि गोंधळलाय
थोडासा हिरमुसलाय
त्याच्या स्वागताची तयारी नाही
उत्साह तर कुठेच दिसत नाही
उत्सवी वातावरण नाही
कसलीच लगबग नाही
नेहमी कशी जय्यत तयारी असते स्वागताची
सर्वांनाच प्रतिक्षा असते त्याच्या आगमनाची
महिला वर्गाला पर्वणीच नटण्यामुरडण्याची
बालगोपाळांना मोदक पटकावण्याची
कलात्मक आरासी केल्या जातात
पानाफुलांनी मखरं सजवली जातात
घराघरांतून पूजा अर्चा केल्या जातात
दहा रात्री देखील जागवल्या जातात
पण या वर्षी असं काहीच नाही होणार
न भुतो न भविष्यती असंच घडणार
त्याचा विरस होणार
आणि तो निघून जाणार
तो जाण्यापुर्वी त्याला वचन देऊ
पुढच्या वर्षी सगळं नीट करू
नेहमीसारखंच तुझं स्वागत करू
या वर्षीचं उट्टं भरून काढू
— शरद दिवेकर
कल्याण
70457 30570
Leave a Reply