नवीन लेखन...

आजचा विषय आमचूर पावडर

आमचूर पावडर म्हणजे कैरी सुकवून केलेली पावडर. कैरी फक्त उन्हाळ्यात उपलब्ध असते. मात्र कैरी पावडर म्हणजेच आमचूर पावडर स्वरूपात साठवली जाऊ शकते. चटकदार आमचूर पावडर ही आमटी व विविध भाज्यांमधून आहारात समाविष्ट केली जाते. आमचूर पावडर हिरव्या किंवा तपकिरी रंगाची असते.

आमचूर पावडरचे फायदे
आमचूर पावडर पित्त कमी करते व पचनक्रियेला चालना देते. आमचूर पावडरचा आहारात समावेश केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते व पोट साफ होण्यास मदत होते. पचनमार्गाचे कार्य सुरळीत करून निरोगी स्वास्थ्य मिळवून देण्यासाठी आमचूर पावडर अतिशय उपयुक्त आहे. या पावडरमुळे पचनशक्ती सुधारते.

वजन घटवण्यासाठी आमचूर पावडर फारच परिणामकारक आहे. त्यातील अॅवन्टिऑक्सिडंट घटक चयापचनाची क्रिया सुरळीत करून वजन घटवण्यास मदत करतात. आमचूर पावडरमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आमचूर पावडरच्या सेवनाने डोळ्यांची क्षमता सुधारते. आहारात आमचूर पावडरचा सामवेश केल्याने डोळ्यांचे विकार होत नाहीत. मोतिबिंदू होण्यापासूनही तुमचे रक्षण होते. आमचूर पावडरच्या सेवनाने, तुमचे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारापासून रक्षण होऊ शकते. त्यात ‘व्हिटामिन सी’ मुबलक प्रमाणात असल्याने आरोग्य सुधारते. रोज सकाळी गुळ व आमचूर पावडर रिकाम्यापोटी घेणे उत्तम! आमचूर पावडर त्वचेचा पोत सुधारण्यासाठीही मदत करते, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? आमचूर पावडर त्वचेतील छिद्र मोकळी करतात, मळ व तेलकटपणा दुर होतो. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. आमचूर पावडर हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येणे, हृदय कमकुवत होणे अशा समस्या कमी होतात.

कशी बनवावी आमचूर पावडर?
आजकाल बाजारात आमचूर पावडर सहज उपलब्ध होते. मात्र घरच्या घरी देखील तुम्ही आमचूर पावडर बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता. आमचूर पावडर बनवण्यासाठी कच्च्या कैर्या् सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करा. हे तुकडे कडक सुर्यप्रकाशात वाळवा. साठवणूकीसाठी पावडर करणार असाल तर कैरीच्या फोडींना हळद लावून त्या नीट सुकवा. हळदीमुळे बुरशी व जंतूंचा संसर्ग होत नाही. फोडी पुरेशा सुकल्यानंतर त्याची पावडर करा व हवाबंद डब्यात साठवून ठेवा. आमचूर पावडर चटणी, भाज्या, आमटी याचबरोबर चिकन व माशाचे सार यासारख्या मासांहारी पदार्थांचीही चव वाढवते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..