नवीन लेखन...

टोकन

ही साधारण तीस वर्षांपूर्वीची युनायटेड वेस्टर्न बँक, अंबरनाथ शाखेतील (आताची आयडीबीआय बँक) घटना आहे. पहिला आठवडा व दिवाळी लगेच असल्यामुळे बँकेत गर्दी होती… बचत खात्यातील खातेदार काऊंटरवर टोकन घेऊन कॅशियर समोरील जागेत बसून आपला नंबर येण्याची वाट पहात होते.

या गर्दीत एक महिला आपल्या प्लॅस्टरमध्ये हात बांधलेल्या  दहा अकरा वर्षाच्या मुलासह बसलेली होती. टोकन मुलाच्या हातात होते व तो त्याच्याशी खेळत होता. थोड्या वेळाने त्या महिलेच्या नावाचा पुकारा झाला, तेव्हा टोकन घेण्यासाठी ती मुलाजवळ आली, तर टोकन त्या प्लॅस्टरच्या आत गेले होते व बाहेर काढण्यासाठी त्या मुलाची धडपड सुरू होती.

….आता त्या आईचे ओरडणे सुरू झाले… इतका वेळ मुलाकडे लक्ष न देणाऱ्या आईची तगमग सुरू झाली, आजूबाजूच्या खातेदारांनीही प्रयत्न सुरू केले… तोपर्यंत कॅशियरने पुढच्या खातेदारांना पैसे वाटप सुरू ठेवले होते.अर्धा तास प्रयत्न करूनही टोकन  निघत नव्हते…  तो मुलगा रडून रडून थकला होता. त्या मुलाला शाळेत पडल्यामुळे दहा दिवसापूर्वीच प्लॅस्टर घातले होते व आजच ते काढणार होते. दवाखान्याचे पैसे देण्यासाठीच त्या मुलाला घेऊन ती महिला बँकेतील पैसे काढायला आली होती. ही सर्व हकीकत समजल्यावर शाखाधिकाऱ्यांनी टोकन हरवल्याचा रितसर अर्ज त्या महिलेकडून लिहून घेतला व कॅशियरला पेमेंट करण्याच्या सूचना दिल्या. त्या महिलेसह शाखेतील एक कर्मचारी व शिपाई त्वरित डॉक्टरांकडे गेले. एक तासानंतर टोकन घेऊन सर्व परत आले…

हा एक वेगळाच अविस्मरणीय अनुभव आम्ही सर्वांनी अनुभवला.

-सुधीर तळवेलकर

(आयडीबीआय  बँकतून सेवानिवृत्त, अंबरनाथ.)

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..