वाल्मिकींनी रामायण लिहिले. मात्र वाल्मिकी हे पूर्वी वाल्या कोळी या नावाने ओळखले जायचे आणि ते चक्क रस्त्यावर वाटमारी करायचे. म्हणजे आपल्याकडे वाटमारी करुन मोठे होण्याची मोठी परंपरा आहेच की. मग हीच परंपरा आताच्या राज्यकर्त्यांनी पुढे चालवली तर बिघडले कुठे?
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि मुंबईतले ५५ पूल बांधल्यावर तिथे जो टोल नावाचा राक्षस ऊभा झाला तो त्यानंतर शांत झालाच नाही. आता महाराष्ट्रात टोल संस्कृती चांगलीच रुजलेय. कोणी कितीही ओरडलं तरी टोल बंद होण्याची शक्यताच नाही. नव्या सरकारला सहा महिन्यातच याची प्रचिती आली आणि आता तर त्याची कबुलीच सरकारने दिली.
आपणही लिहा आपले मत. मराठीसृष्टीचे सभासद असाल तर थेट लॉगिन करुन लिहायला सुरुवात करा. फेसबुकद्वारे लॉगिन करुनही आपण लिहू शकता.
लॉगिन शिवाय लिहायचं असेल तर आपले नाव आणि इ-मेल जरुर लिहा…
Leave a Reply