टोनी लुईस यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला.
क्रिकेटमध्ये एखाद्या सामन्यात पाऊस किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमुळे अडथळा आला आणि त्यामुळे जर वेळ वाया गेला तर सामन्याचा निकाल लावण्यासाठी एका नियमाचा वापर केला जातो. डकवर्थ-लुईस या नावाने ओळखळ्या जाणाऱ्या नियमावर अनेक क्रिकेट चाहते नाराज असतात. कारण यामुळे अनेकदा चित्र-विचित्र असे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघाला मिळते. या नियमाचा ज्यांनी शोध लावला त्यापैकी एक टोनी लुईस.
गणिततज्ञ टोनी लुईस यांनी फ्रँक डकवर्थ यांच्यासह मिळून क्रिकेट सामन्यांचा निकाल लावता यावा यासाठी हा नियम तयार केला होता. पावसामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे जर सामन्यात अडथळा आला तर विरुद्ध संघाला किती धावांचे लक्ष्य द्यायचे याचा नियम तयार करणे गरजेचे होते.
लुईस आणि डकवर्थ यांनी १९९७ मध्ये एक फॉर्म्युला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सादर केला.१९९७ साली झिमाब्वे आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यात हा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला. १९९९ मध्ये याचा वापर इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये करण्यात आला.पुढे आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने) ही प्रणाली वनडे आणि टी-२० सामन्यांदरम्यान पाऊस झाल्यास वापरण्यास सुरुवात केली.
‘डकवर्थ-लुइस’ या जोडगोळीने तयार केलेल्या प्रणालीमध्ये २०१५ साली तिसऱ्याची भर पडली ती म्हणजे स्टीव्ह स्टर्न यांची. डकवर्थ-लुइस पद्धतीत सुलभीकरण करण्यात स्टर्न यांचे योगदान लक्षात घेऊन २०१५ च्या विश्वचषकापासून ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ या सुधारित नावाने ही प्रणाली अंगीकारण्यात आली आहे.
टोनी लुईस यांचे १ एप्रिल २०२० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply